अकोले तालुक्यातील आरोग्य विभागाच्या आरोग्य सेवेचा उडाला बोजवारा
अकोले: अकोले तालुक्यात चार ग्रामीण रूग्णालये आणि १० प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक, सेविकांची निम्याहून अधिक पदेच रिक्त आहेत. त्यामुळे तालुक्याच्या आरोग्य विभाग सध्या ऐन पावसाळ्यात व्हेंटीलेटरवर असून या दुर्गम-डोगराळ आदिवासी तालुक्यात आरोग्य सेवेचा पुरता बोजवारा उडाला आहे.
अकोले तालुक्याची लोकसंख्या २ लाख ९१ हजार ९५० असून यामध्ये १ लाख ३९ हजार ७३० इतकी आदिवासींची संख्या आहे. तालुक्यात एकूण १९१ गावे असून ११८ गावे ही आदिवासी क्षेत्रात येतात. ८० टकके तालुका डोंगराळ- दुर्गम भाग आहे. ३३ गावांमध्ये अजूनही मोबाइलची रेंज नाही. किंवा संपर्कासाठी साधने तिथे नाहीत. काही वर्षापासून तालुक्यातील डोंगराळ-दुर्गम भागात एखादा माणूस आजारी पडला तर त्याला डोली करून आणले जायचे पण येत्या काही वर्षात हे चित्र बदलले असले तरी सुविधा उभ्या राहिल्या मात्र तिथे यंत्रणाच नसल्याने आरोग्य विभाग आज व्हेंटीलेटअर वर आहे. तालुक्यात अकोल, कोतूळ, समशेरपूर, राजूर येथे चार ग्रामीण रूग्णालये आहेत. पण गेल्या काही दिवसांपासून या चार ग्रामीण रुग्णालयांमध्ये अकोले वगळता इतर तीन रूग्णालयात वैद्यकीय अधिक्षक वर्ग् एकच्या जागाच रिक्त आहे. या चारही ग्रामीण रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणावर रोज रुग्ण येत असतात.
अकोलयातील ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीची अवस्था जीर्ण झाल्यासारखी आहे. शौचालयांची दुरावस्था तुटलेले दरवाजे, औषधांची वाणवा तर आहेच पण सफार्ठ कारमागर नसल्याने स्वच्छतेचे तीन-तेरा वाजलेत. वीजवाहक केबल अनेक ठिकाणी लटकल्याचे दिसत. भिंतींना काही ठिकाणी तडेही गेलेत. रुग्णालयात पावसाळ्यात काही ठिकाणी पाणीही गळते.रुग्णालयात उत्त्रीय तपासणीसाठी स्वीपर, दोन लिपीक, दोन पर्यवेक्षीका, शिपाई व नवजात शिशू, अतिदक्षता विभागात कंत्राटी दोन पर्यवेक्षका आदी पदे रिक्त आहे. तर वैद्यकीय अधिक्षक वग्र दोनची एक जागा रिक्त आहे.
तालुक्यात चार ग्रामीण रुग्णलयांबरोबरच १० प्राथमिक आरोग्य केंद्र असून ब्राम्हणवाडा, मवेशी, घाटघर पथक, कोतूळ, लाडगाव, शेंडी या ठिकाणी वैद्यकीय अधिकारीच नाही, ही सर्व पदे रिक्त गेल्या वर्षापासून आहेत. त्याचा परिणाम आरोग्य सेवेवर होत आहे.
अकोले शहरातील ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळावा यासाठी शासनाकडे तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रस्ताव पाठविला आहे. त्यास मंजूरी मिळाल्यास विविध प्रकारच्या वैद्यकीय सुविधा तालुक्याला मिळतील.
Website Title: Health Department Health Department In Akole Taluka Fires Up