Home अकोले अकोले: भुमीअभिलेख कार्यालयाचा अनागोंदी कारभार

अकोले: भुमीअभिलेख कार्यालयाचा अनागोंदी कारभार

अकोले(मान्हेरे वार्ताहर):  अकोले तालुक्यातील भुमीअभिलेख कार्यालयातील कर्मचारी वर्ग शेतकऱ्यांच्या सोयीसाठी अकोले येथे कार्यालय आहे. परंतु येथील कर्मचारी वर्ग तालुक्यातील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक व फसवणूक करत आहे. शेतकऱ्यांनी मोजणी साठी अर्ज केल्यानंतर तब्बल महिना ते दिड महिन्याने मोजणीचा नंबर येतो .त्यात शेतकऱ्यांनी भुकरमापक; निमनतदार.यांना नेण्याआणण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी व्यवस्था करायची अशी कार्यालयाची पध्दत आहे.
भुमीअभिलेख चे कर्मचारी शेतकऱ्यांच्या सेवेसाठी आहे. की शेतकरी कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी आहे. हेच कळत नाही. सुगाव बु¡¡ येथील सव्हे नंबर ८७/५ क्षेत्रफळ ८५आर आतापर्यंत चार वेळा मोजणी झाली परंतु तीन वेळा वेगवेगळ्या ठिकाणी हद्दीखुणा दाखविल्या तर चौथ्यांदा मात्र भलतीकडेच खुणा दाखविण्यात आल्या .याचा नेमका अर्थ काय आहे? हे गौडबंगाल शेतकऱ्यांना समजले नाही. यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. प्रत्येक मोजणीसाठी वेगवेगळ्या हद्दीखुणा का दाखविल्या जातात की कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाची गरज आहे काय? की कोणाच्या सोयीसाठी हद्दीखुणा बदलल्या जातात यावरून भुमीअभिलेख कार्यालयाचा अनागोंदी कारभार जनतेसमोर आला.
कर्मचारी वर्ग शेतकऱ्यांच्या सेवेसाठी आहे. की शेतकरी वर्ग कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी असतात. याबाबत वरिष्ठांनी शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी शेतकरी वर्गाची मागणी होत आहे.
Website Title: Akole chaos of the land records office

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here