Home अकोले मुळा नदीवरील कोतूळ येथील पूल पाण्याखाली;नागरिक व विद्यार्थ्यांची होणार हेळसांड

मुळा नदीवरील कोतूळ येथील पूल पाण्याखाली;नागरिक व विद्यार्थ्यांची होणार हेळसांड

अकोले: तालुक्यातील पिंपळगाव खांड धरणात पाणी अडविले जात असल्याने मुळा नदीवरील कोतूळ येथील मुख्य वाहतुकीचा पूल बुधवारी पहाटे पाण्याखाली गेला. हा पूल सात महिने पाण्याखाली राहील. मात्र गत पर्षी जून महिन्यातच पिंपळगांत खांड धरण भरल्याने हा पूल संपूर्ण पाण्याखाली गेला होता.

तीन दिवसांपूर्वी मुळा नदीचा उगम असलेल्या हरिश्चंद्रगड परिसरात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. त्यातून मुळा नदी वाहती झाली. मुळा नदीवर असलेल्या ६०० दशलक्ष घनफूट क्षमतेच्या पिंपळगाव क्षांड धरणात पाणी जमा होऊ लागले. मात्र, त्यानंतर पावसाचा जोर मंदावल्याने पाण्याची जेमतेम आवक सुरूच होती. यातून पाणी पातळी वाढत जाऊन पुलाच्या वर दीड ते दोन फूट पाणी येऊन बुधवारी सकाळपसून पुलावरील वाहतूक बंद झाली.

पुलावर पाणी आल्याने कोतूळ येथे शिक्षणासाठी जाणाऱ्या पांगरी, पोरेवाडी, पिंपळगाव खांड या भागातील विद्यार्थांना पांगरी, मोग्रस, धामणगाव पाठ असा सुमारे १५ किलोमीटरचा वळसा घालून प्रवास करून कोतूळ येथे शिक्षणासाठी जावे लागणार आहे. दरवर्षी पुलावर पाणी आले की, विद्यार्थ्यांची हेळसांड सुरु होते. तर काहीवेळा या नदीवर विनापरवाना सुरू असलेल्या काही होङयांचा विद्यार्थ्यांना आधार घ्यावा लागतो.

पिंपळगाव खांड धरणात पाणीसाठा केल्याने कोतूळ येथील पूल सात महिने पाण्याखाली राहतो. यासाठी पर्यायी कोतूळ व परिसरातील नागरिकांनी अनेक वेळा केली आहे. मात्र या पुलास मुहूर्त मिळत नसल्याने विशेषत: शालेय विद्यार्थ्यांच्या पालकांच्या मनात नाराजी आहे. दरम्यान या पूलाची या महिन्यातच गोड बातमी ऐकायला मिळेल, अशी माहिती जलसंपदा विभागाच्या एका अधिकाऱ्याने दिली. मात्र प्रत्यक्षात काम सुरू झाल्यावरच खरे काय कळेल, अशी लोकांची भावना आहे.

Website Title: The Bridge Of Kootul On The River Of Mula, Under The Water, Will Be Conducted By Citizens And Students

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here