Home जळगाव २१ वर्षीय नर्सचा कुटुंबासोबत व्हिडिओ कॉल, ऑन ड्युटीच आयुष्य संपवलं

२१ वर्षीय नर्सचा कुटुंबासोबत व्हिडिओ कॉल, ऑन ड्युटीच आयुष्य संपवलं

Jalgaon: २१ वर्षीय नर्सने ऑन ड्यूटी असतानाच गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना.

21-year-old nurse's on-duty video call with her family ended her life suicide

जळगाव : रुग्णालयात काम करणाऱ्या २१ वर्षीय नर्सने ऑन ड्यूटी असतानाच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची  घटना घडली आहे. जळगाव शहरातील स्वातंत्र्य चौकातील अथर्व हॉस्पिटल येथे रविवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. अकिना शाजी (वय-२१ वर्ष, रा. इकाड, राज्य केरळ ह. मु. अथर्व हॉस्पिटल, स्वातंत्र्य चौक, जळगाव) असे गळफास घेतलेल्या तरूणीचे नाव आहे. तिच्या आत्महत्या करण्यामागील कारण अद्याप समजू शकले नाही. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील अथर्व हॉस्पिटल येथे गेल्या काही महिन्यांपासून अकिना शाजी ही तिची मोठी बहीण अगीलू शाजी हिच्यासोबत राहत होती. दोन्ही बहिणी एकत्रच हॉस्पिटलमधील रूममध्ये वास्तव्याला व त्याच ठिकाणी एकत्रच नोकरी नोकरी करत होत्या. दरम्यान, शनिवारी अकिना हिची रात्र पाळी ड्यूटी होती. त्यावेळी तिची मोठी बहिण अगीलू हिची ड्यूटी संपल्याने ती रूमवर निघून गेली होती

मध्यरात्री अकिनाने हॉस्पिटलमध्येच कामावर असताना गळफास घेऊन आत्महत्या केली. दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास काही पारिचारिका नेहमीप्रमाणे रुग्णालयात कामावर आल्या असता, त्यांना रुग्णालयातील पारिचारिका अकिना ही गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली, त्यांना मोठा धक्का बसला. त्यानंतर घटना समोर आल्यानंतर अकीना तिला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

दरम्यान आत्महत्या करण्यापूर्वी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास अकीना हिने फोनवरुन तिच्या कुटुंबियांशी संवाद साधला होता, सर्व काही व्यवस्थित आहे का? अशी विचारणा देखील केली, व त्यानंतर काही तासांनी तिने आत्महत्या (Suicide) केल्याचे समोर आले. याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहे.

Web Title: 21-year-old nurse’s on-duty video call with her family ended her life suicide

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here