Home क्राईम जीवे मारण्याची धमकी देत मोलकरणीवर अत्याचार

जीवे मारण्याची धमकी देत मोलकरणीवर अत्याचार

Palghar Crime News:  जीवे मारण्याची धमकी देऊन मोलमजुरीसाठी येणाऱ्या मोलकरणीवर मालकाने वारंवार अत्याचार (Rape) केल्याची घटना.

Rape on maid by threatening to kill her

पालघर: जीवे मारण्याची धमकी देऊन मोलमजुरीसाठी येणाऱ्या मोलकरणीवर मालकाने वारंवार अत्याचार केल्याची घटना डहाणूमध्ये समोर आली आहे. याप्रकरणी मोलकरणीच्या फिर्यादीवरुन डहाणू पोलिसात कलम 376 सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डहाणू पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. खोदादाद इराणी असे आरोपी मालकाचे नाव आहे. या घटनांमुळे मोलमजुरी करणाऱ्या आदिवासी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. अत्याचार करणाऱ्या आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आदिवासी मजुर महिलांनी केली आहे.

पीडित महिला आपल्या कुटुंबातील काही महिलांसह आरोपीच्या वाडीत चिकू तोडण्यासाठी आणि घरकाम करण्यासाठी जात होती. एक दिवस महिला एकटी असल्याची संधी साधत आरोपीने पीडितेवर अत्याचार केला. यानंतर जीवे मारण्याची घेत आणि दमदाटी करत पाच महिने महिलेवर अत्याचार केला. अखेर आरोपीच्या अत्याचाराला कंटाळेल्या महिलेने डहाणू पोलीस ठाण्यात धाव घेत सर्व प्रकार सांगितला. यानंतर पीडितेच्या फिर्यादीवरुन डहाणू पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली.

Web Title: Rape on maid by threatening to kill her

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here