Home अहमदनगर मालट्रक व दुचाकीत समोरासमोर धडक होऊन अपघातात, दोघे युवक ठार

मालट्रक व दुचाकीत समोरासमोर धडक होऊन अपघातात, दोघे युवक ठार

Ahmednagar News:  नगर – मनमाड महामार्गावरील हॉटेल मेजवानीसमोर मालट्रक व दुचाकी यांच्यात समोरासमोर जबर धडक होऊन झालेल्या अपघातात (Accident) लोणी खुर्द येथील दोन युवकांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.

Accident Two youths were killed in a head-on collision between a goods truck and a two-wheeler

कोल्हार: कोल्हार येथे नगर – मनमाड महामार्गावरील हॉटेल मेजवानीसमोर मालट्रक व दुचाकी यांच्यात समोरासमोर जबर धडक होऊन झालेल्या अपघातात लोणी खुर्द येथील दोन युवकांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात संतोष नाना पारखे (वय ३९) व सचिन आबासाहेब खराड (वय ३७) अशी मृत्युमुखी पडलेल्या तरुणांची नावे आहेत.

नगर – मनमाड महामार्गावरील हॉटेल मेजवानीसमोर दुचाकी (क्रमांक – एम. एच. १७ बीपी ८७५०) व मालवाहतूक ट्रक (क्रमांक – टी एन ५२ एफ २५२०) यांची समोरासमोर धडक झाली. या घटनेची खबर लोणी पोलिसांना मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मृतांना शवविच्छेदनासाठी प्रवरा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. अपघाताच्या घटनेने लोणी परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. लोणी पोलीस ठाण्यात या संदर्भात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे हे करीत आहेत.

Web Title: Accident Two youths were killed in a head-on collision between a goods truck and a two-wheeler

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here