भंडारदरा ओव्हरफ्लो! प्रवरा नदीपात्रात ३१९७ क्युसेकने विसर्ग सुरु
Bhandardara Overflow: भंडारदरा पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असून धरणात पाण्याची आवक वाढत असल्याने धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी २३६२ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू.
भंडारदरा: भंडारदरा पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असून धरणात पाण्याची आवक वाढत असल्याने धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यात येत आहे.
धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी आज (दि.२४) रोजी २३६२ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आले आहे हे पाणी प्रवरा नदीत सोडण्यात आले आहे. धरणातून वीजनिर्मितीद्वारे ८३५ क्यूसेक विसर्ग सुरु असून धरणातून एकूण ३१९७ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणातील पाणीसाठा ८२ टक्के झाला असून पावसाचे प्रमाण असेच राहिल्यास विसर्ग अजून वाढविण्याची होण्याची शक्यता देखील आहे. भंडारदरा परिसरात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावलीयं.
Web Title: Bhandardara Overflow Discharge started at 3197 cusecs in Pravara river
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App