Home क्राईम कुणीतरी आलं म्हणून दरवाजा उघडायला गेली, दार उघडताच महिला जमिनीवर कोसळली,  गोळीबाराच्या...

कुणीतरी आलं म्हणून दरवाजा उघडायला गेली, दार उघडताच महिला जमिनीवर कोसळली,  गोळीबाराच्या घटनेने खळबळ

Chandarapur Crime: अज्ञाताकडून झालेल्या गोळीबारात (Firing) एका निष्पाप महिलेचा मृत्यू.

An innocent woman died in firing by unknown persons

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा शहरात काल रात्री  जिल्ह्याला हादरवणारी घटना घडली आहे. अज्ञाताकडून झालेल्या गोळीबारात एका निष्पाप महिलेचा मृत्यू झाला आहे.  तर एक जण जखमी झाला आहे. पूर्वशा सचिन डोहे असे मृत  महिलेचे नाव असून, त्या भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष सचिन डोहे यांच्या पत्नी आहेत. तर लल्ली शेरगिल असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. जखमी व्यक्तीला उपचारासाठी चंद्रपूर शहरातील रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. याप्रकरणी राजुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 याबाबत अधिक माहिती अशी की, चंद्रपूरमधील राजुरा शहरात अवैध कोळसा उत्खनन मोठ्या प्रमाणावर चालते. यामुळे येथे कोळसा माफियांचा सुळसुळाट आहे. याच कोळसा माफियागिरीतून लल्ली शेरगिल याच्यावर हल्ला करण्यात येत होता. यावेळी लल्ली हा जीव वाचवण्यासाठी शहरातील सोमनाथपूर वार्डातील भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोहे यांच्या घरी आश्रयासाठी घुसला. यावेळी आरोपीही त्याचा पाठलाग करत डोहे यांच्या घराजवळ आले.

यावेळी गोळीबारत पूर्वशा यांचा हकनाक बळी गेली. दरवाजा ठोठावला म्हणून डोहे यांची पत्नी पूर्वशा या दरवाजा उघडण्यास आल्या. दरवाजा उघडताच पूर्वशा यांच्यावर दोन गोळ्या आरोपीने झाडल्या. यात पूर्वशा यांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य लल्ली नामक व्यक्ती जखमी झाला.

कोळसा माफियाकडून एका अज्ञात व्यक्तीवर हा हल्ला करण्यात आला होता. मात्र दुर्दैवाने पूर्वशा डोहे या समोर आल्या आणि नाहक बळी गेल्या. या घटनेमुळे राजुरा शहरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून, एक अल्पवयीन आहे. पोलीस पुढील  तपास करत आहेत.

Web Title: An innocent woman died in firing by unknown persons

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here