Home औरंगाबाद धक्कादायक! साडेतीन वर्षाच्या चिमुकलीवर शाळेतच अत्याचार

धक्कादायक! साडेतीन वर्षाच्या चिमुकलीवर शाळेतच अत्याचार

Sambhaji Nagar Crime: पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका साडेतीन वर्षाच्या चिमुकलीवर शाळेतच अत्याचार (abused) केल्याची धक्कादायक घटना.

three and a half year old child was abused at school

छत्रपती संभाजीनगर : शहरातील पुंडलिकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका साडेतीन वर्षाच्या चिमुकलीवर शाळेतच अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चिमुकलीच्या वर्ग शिक्षकाच्या मदतीनेच हा प्रकार झाला असल्याची  माहिती समोर आली आहे.

छत्रपती संभाजीनगर शहरातून ही घटना समोर आली आहे.  शहरातील एन ४ परिसरात असलेल्या या शाळेत सदरची चिमुकली शिकत होती. एक मुलगी आणि तिचा बॉयफ्रेंड तिला एका खोलीत नेऊन तिच्यावर अत्याचार करायचे. दरम्यान मुलीच्या आई-वडिलांनी पुंडलिकनगर पोलीस ठाणे गाठत कैफियत मांडली. पोलीस निरीक्षक राजश्री आडे यांनी तातडीने अत्याचार करणारी मुलगी आणि तिचा बॉयफ्रेंड यांना ताब्यात घेतले असून अधिक  तपास पुंडलिक नगर पोलीस करीत आहेत.

वर्ग शिक्षकांच्या मदतीने एक मुलगी आणि तिचा बॉयफ्रेंड मागील काही दिवसांपासून सातत्याने लैंगिक अत्याचार करत असल्याची तक्रार चिमुकलीच्या आईने पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात दिली. या घटनेमुळे पुंडलिक नगर परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

Web Title: three and a half year old child was abused at school

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here