Home क्राईम अनैतिक संबंधात पतीचा अडथळा, सुपारी देऊन काटा काढला

अनैतिक संबंधात पतीचा अडथळा, सुपारी देऊन काटा काढला

Pune Crime:  पिंपरे खुर्द येथे झालेला खून (Murder) हा अनैतिक संबंधातून झाल्याचे पोलीस तपासात उघडकीस.

Obstacle of husband in immoral relationship murder of husband

पुणे : पुरंदर तालुक्यातील पिंपरे खुर्द येथे झालेला खून हा अनैतिक संबंधातून झाल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले  आहे. हरिश्चंद्र थोपटे असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या खुनात मृताच्या पत्नीचा मोठा सहभाग असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाचा अवघ्या दोन तासात जेजुरी पोलिसांनी छडा  लावला असून यात मयत च्या पत्नीसह नऊ जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

धीरज उर्फ बंटी संजय ढावरे, निकेश विरेंद्रसिंह ठाकुर, सिध्दांत संभाजी भोसले रा. जेजुरी लवथळेश्वर, सुरेश कांतीलाल कडाले, लखन सुर्यवंशी यांच्यासोबत कट रचून खुन करण्याची सुपारी देऊन खुन केला. हा खून करताना स्वरूप रामदास जाधव, विशाल चव्हाण, शुभम मचारे यांनी मदत केल्याचे निष्पन्न झाले, या सर्व आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

याबाबत मिळालेली  माहिती अशी की,  या घटनेतील मुख्य आरोपी धीरज ढावरे आणि मृताची पत्नी हरिश्चंद्र थोपटे यांचे तीन वर्षांपासून अनैतिक संबंध होते. मात्र, या अनैतिक संबंधात हरिश्चंद्र थोपटे हे अडथळा ठरत होते. त्यामुळे त्यांना मारण्याचा कट रचला. त्यानुसार प्रणव ढावरे याने आपल्या आठ मित्रांसोबत थोपटे यांच्या मागावर होता. शुक्रवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास थोपटे कंपनीतून घरी चालले होते. घराजवळील नीरा डाव्या कालव्याच्या विरुद्ध बाजूला दबा धरून बसलेल्या ढावरे व त्यांच्या साथीदारांनी थोपटे यांची मोटारसायकल अडवली. त्यांच्यावर अचानक सर्वांनी हल्ला केला. काहींनी थोपटे यांना पकडले तर काहींनी तलवारी व कोयत्याने सपासप वार केले. चेहऱ्यावर व मानेवर पाच वार करत जीव जाईपर्यंत त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. वार जिव्हारी लागल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. जेजुरी पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अवघ्या दोन तासात मृताच्या पत्नीसह नऊ आरोपींना ताब्यात घेतले आहे. अधिक तपास पोलीस करीत आहे.

Web Title: Obstacle of husband in immoral relationship murder of husband

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here