Home अकोले मुळा नदी दुथडी,  विक्रमी पाण्याची आवक

मुळा नदी दुथडी,  विक्रमी पाण्याची आवक

Akole News: मुळा नदी (Mula River) दुथडी भरून वाहत आहे. या मोसमातील आजपर्यंतचा हा सर्वाधिक विसर्ग.

Mula river Duthdi, record water inflow

अकोले:  मुळा धरण पाणलोट क्षेत्रातील हरिश्चंद्रगड परिसरात दिवसभर मुसळधार पाऊस झाला. यामुळे मुळा नदी दुथडी भरून वाहत आहे. परिणामी मुळा धरणात रात्रीतून विक्रमी पाण्याची आवक होण्याची शक्यता आहे.  या मोसमातील आजपर्यंतचा हा सर्वाधिक विसर्ग आहे.

पाणलोटात पाऊस सुरू असल्याने काल सोमवारी सकाळी 6 वाजता मुळेचा विसर्ग 6152 क्युसेक होता. त्यानंतर जोरदार पाऊस झाल्याने सकाळी 9 वाजता त्यात वाढ होऊन तो 10738 क्युसेक झाला. त्यानंतर दुपारी बारा वाजता त्यात आणखी वाढ होऊन 11,152 क्युसेक झाला. पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याने दुपारी तीन वाजता विसर्ग कमी होऊन तो 9,541 क्युसेकवर आला तर सायंकाळी त्यात आणखी घट होत तो 8,373 क्युसेकवर आला. 11 हजार 152 इतकी विक्रमी आवक काल दुपारी12 वाजता नोंदविली गेली. या पावसाळ्यातील ही सर्वाधिक आवकेची नोंद झाली अशी माहिती मुळा पाटबंधारे विभागाचे उपअभियंता राजेंद्र पारखे यांनी सांगितले.

भंडारदरा जलाशयातील पाणीसाठा ८३ टक्के झाला आणि धरणाच्या स्पिलवे गेटचे दरवाजे उघडण्यात आले. या धरणातील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी सायंकाळी सहा वाजता धरणातून ४ हजार २९७ क्युसेकने पाणी प्रवरा नदीच्या पात्रात सोडण्यात आले.

Web Title: Mula river Duthdi, record water inflow

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here