Home क्राईम लग्नाच्या आमिषाने गरोदर केले, धर्मांतर करून गर्भपातासाठी दबाव

लग्नाच्या आमिषाने गरोदर केले, धर्मांतर करून गर्भपातासाठी दबाव

Nashik Road: गावातील युवतीला लग्नाचे आमिष दाखवून लैगिक शोषण करीत बलात्कार (Rape) करून तिला गरोदर केल्यानंतर पीडितेवर गर्भपात करण्यासाठी जबरदस्ती करीत दबाव आणल्याचा धक्कादायक प्रकार.

Rape Case Made pregnant by the lure of marriage, pressured to abort by conversion

नाशिक रोड: देवळाली गावातील युवतीला लग्नाचे आमिष दाखवून लैगिक शोषण करीत बलात्कार करून तिला गरोदर केल्यानंतर पीडितेवर गर्भपात करण्यासाठी जबरदस्ती करीत दबाव आणल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

कटलरी दुकानात कामाला असलेल्या पीडित युवतीची शेजारील कपड्याच्या दुकानातील मुश्ताक रौफ शेख याच्याशी २०१८ मध्ये ओळख झाली होती. त्यांच्यात २०१९ पासून प्रेमसंबंध निर्माण झाले. मुश्ताकने युवतीला वेगवेगळ्या लॉजमध्ये नेऊन तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यामुळे मार्च २०२३ मध्ये युवती गर्भवती राहिल्याने मुश्ताकने तिला नाशिकमधील एका दवाखान्यात नेले. त्यावेळी डॉक्टरांनी तपासून युवती चार महिन्यांची गर्भवती असल्याचे निदान केल्यानंतर मुश्ताकने डॉक्टरांना गर्भपात करण्यास सांगितले. मात्र लग्नाचा पुरावा नसल्याने गर्भपात करता येणार नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे मुश्ताक व युवतीने लग्न करायचे ठरवले. लग्न केल्यानंतर पीडित युवतीचे नाव आयेशा शेख ठेवले.

गेल्या १८ जुलै मुश्ताकने काही कागदांवर युवतीच्या सह्या घेऊन दोघे एसटीने नगर जिल्ह्यातील लोणी येथे मुश्ताकच्या मावशीकडे गेले. मुश्ताकने युवतीचा मोबाइल बंद करून ठेवला. २० जुलैला संध्याकाळी लोणी पोलिस ठाण्याचे पोलिस आले तेव्हा मुश्ताक पळून गेला. त्यानंतर पोलिसांनी पीडित युवतीच्या आईला बोलावून घेऊन त्यांच्या ताब्यात मुलीला दिले. लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बळजबरीने अतिप्रसंग करून धर्मांतर करून लग्न केले. त्यानंतर गर्भपात करण्यासाठी बळजबरी केली अशी फिर्याद दिल्याने उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Rape Case Made pregnant by the lure of marriage, pressured to abort by conversion

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here