Home अहमदनगर अहमदनगर: २२ टन रेशनचा तांदूळ पकडला

अहमदनगर: २२ टन रेशनचा तांदूळ पकडला

Ahmednagar 22 tons of ration rice seized

Ahmednagar | Karjat | कर्जत: स्वस्त धान्य दुकानातील तांदूळ काळ्या बाजाराने खरेदी करून तो खुल्या बाजारात नेऊन चढ्या भावाने विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या दौंड तालुक्यातील दोघांवर कर्जत पोलिसांनी सोमवारी रात्री सापळा रचून कारवाई केली.

कर्जत तालुक्यातील बिटकेवाडी शिवारातून स्वस्त धान्य दुकानातील तांदूळ बनावट क्रमांकाच्या ट्रकमधून वाहतूक होत असल्याची (seized)  माहिती कर्जत पोलिसांना मिळाली. पोलिसानी तात्काळ सापळा बिटकेवाडी शिवारात पीरफाटा येथे रचला. रात्री ९ वाजेच्या सुमारास वालवडकडून ट्रक येताना दिसला. पोलिसांनी ट्रक थांबवून चालकाला नाव विचारले असता त्याने ज्ञानेश्वर कल्याण काळे रा. दौंड असे सांगितले. ट्रकची झडती घेतली असता तांदळाच्या गोण्या आढळून आल्या. चालकाला प्रश्न विचारले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसांनी विश्वासात घेऊन विचारले असता वेगळाच प्रकार समोर आला. ट्रकमध्ये २२ टन तांदूळ होता.

हा ट्रक गणेश लालासाहेब निंबाळकर याचा असून या ट्रकवर पूर्वी कर्जत तालुक्यातील पाटेगाव येथील माउली पवार हा चालक होता. त्याचे ट्रक मालकाकडे कामाचे पैसे असूनही पैसे देत नसल्याने  ट्रक मालकाने केडगाव येथून रेशनचा माल भरल्यानंतर माउली पवार याने तांदळाने भरलेला ट्रक थेट आपल्या गावी आणला होता. मालकाच्या सांगण्यावरून आता हा ट्रक पाटेगाव येथून वरवंड येथे ट्रक मालकाच्या घरी चाललो असल्याची माहिती चालक ज्ञानेश्वर काळे यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला असून माउली पवार व ज्ञानेश्वर काळे यांना अटक केली आहे.

Web Title: Ahmednagar 22 tons of ration rice seized

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here