Home अहमदनगर बनावट लग्न लावून लाखो रुपये लुटणारी टोळी जेरबंद

बनावट लग्न लावून लाखो रुपये लुटणारी टोळी जेरबंद

Jailed for robbing lakhs of rupees by arranging fake marriages

Ahmednagar | Parner | पारनेर:  मुलींची संख्या कमी असल्याने तसेच मुलींचे शिक्षण जास्त असल्याने मुलांना मुली मिळत नाही  यामुळे गुडग्याला बाशिंग बांधलेल्या मुलांचे आई-वडिल हैराण झालेले आहेत.  याचाच फायदा घेत लाखो रुपये लुटीच्या (fake marriages fraud) घटना समोर येत आहे.

बनावट लग्न करून लाखो रुपये घेऊन मुलीसह फरार होणाऱ्या एका टोळीस सुपा पोलिसांनी अटक केली आहे. यात मुलीसह तीन महिला व एका पुरुषाचा समावेश आहे. या टोळीतील  एक महिला फरार झाली आहे.

अमित रामचंद्र मारोते (रा. औरंगाबाद) मुलीची आई व अल्पयीन मुलगी (दोघी, रा. पोहेगाव ता. कोपरगाव) अशी संशयितांची नावे आहेत. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर यातील संशयित मध्यस्थ महिला ज्योती धंनजय लांडे रा. वाघोली पुणे) ही पसार झाली आहे. याप्रकरणी सुपा येथील सुहास भास्कर गवळी यांनी सुपा पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे.

त्यानुसार मध्यस्थ लांडे या महिलेच्या माध्यमातून सर्व संशयितांनी २६ व २७ फेब्रुवारीला गवळी यांना लग्न ठरवण्यासाठी आळंदी (ता. खेड, जिल्हा पुणे) येथे बोलवले होते. याठिकाणी लग्नासाठी मुलगी दाखवून तीचे खोटे आधार कार्ड व खोटा शाळेचा दाखला दाखवला. तसेच लग्न खर्चासाठी २ लाख ३० हजार घेतले मात्र नंतर सर्वजण गायब झाले. गवळी यांच्या तक्रारीवरून सुपा पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवत औरंगाबाद येथून मरोते व मुलीसह तीच्या आईला ताब्यात घेतले.

संशयितांवर फसवणुकीसह विविध गुन्हे दाखल केले आहेत. या गुन्हातील मुलगी आल्पवयीन सल्याने तीचा गुन्हा औरंगाबाद येथे वर्ग करण्यात आला आहे. तर मध्यस्थ महिलेचा शोध चालू आहे. संशयितांवर फसवणुकीसह विविध गुन्हे सुपा पोलीस ठाण्यात दाखल केले आहेत. अधिक तपास एस. डी. ओहळ तपास करीत आहे.

Web Title: Jailed for robbing lakhs of rupees by arranging fake marriages

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here