Home अहमदनगर नव्या वादानंतर इंदोरीकर महाराजांचा मोठा निर्णय; यापुढे कीर्तनाच्या कार्यक्रमात…

नव्या वादानंतर इंदोरीकर महाराजांचा मोठा निर्णय; यापुढे कीर्तनाच्या कार्यक्रमात…

Big decision of Indorikar Maharaj after new dispute

अहमदनगर | Ahmednagar: अहमदनगरचे प्रसिद्ध कीर्तनकार तथा समाजप्रबोधनकार इंदोरीकर महाराज (Indorikar Maharaj) यांनी कीर्तनादरम्यान केल्या जाणाऱ्या वक्तव्यांवरुन सातत्याने वाद निर्माण होत असल्याने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.  

इंदुरीकर महाराजांनी युट्यूबर्सवर टीका करताना वापरलेल्या शब्दांवरुन नवीन वाद निर्माण झाल्यानंतर आता यापुढे कीर्तनाच्या ठिकाणी मोबाईल बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाला जाणाऱ्यांना मोबाईल सोबत नेता येणार नाही. सोमवार आणि मंगळावर अशा सलग दोन दिवस मोबाईल न वापरण्यासंदर्भात कीर्तनादरम्यान वारंवार विनंती करुनही अगदी दम दिल्याप्राणे मोबाईल बंद करण्यास सांगावं लागत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

Web Title: Big decision of Indorikar Maharaj after new dispute

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here