Home क्राईम Rape | संगमनेर शहरात ३४ वर्षीय महिलेवर अत्याचार

Rape | संगमनेर शहरात ३४ वर्षीय महिलेवर अत्याचार

Sangamner rape Case:  ओळखीतूनच मैत्री अन मग अत्याचार.

  34-year-old woman Rape in Sangamner city

संगमनेर: संगमनेर शहरातील मालदाड रोड परिसरातून एका ३४ वर्षीय महिलेवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. या महिलेची जवळच्या व्यक्तीसोबत मैत्री झाली मग फोन वर गप्पा रंगू लागल्या, तुम्ही किती सुंदर दिसता, किती गोड बोलता असे बोलून जवळीक साधून वाढदिवसाच्या निमित्ताने हॉटेलवर नेऊन इच्छा नसताना ब;बळजबरीने अत्याचार केला. सदर घटना ४ सप्टेंबर २०२० ते १८ ऑगस्ट २०२२ या दरम्यान वेळोवेळी घडली, तसेच धमकी देत वेळोवेळी बलात्कार केला. याबाबत पिडीत महिलेने संगमनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, संगमनेर शहरालगत मालदाड रोड परिसरात राहणारी पिडीत महिला संगमनेरातील एका नामांकीत कापड दुकानात काम करत होती. त्यांचे घरचे किराणा दुकान असल्याने घरच्या दुकानात वेळ देऊन कापड दुकानात काम करत असल्याने मोठ्या कसरतीत ती जीवनजगत होती. 2020 मध्ये पिडीत महिलेच्या भावाने प्रेम विवाह केला. त्यावेळेस आरोपी कैलास याने लग्न करण्यासाठी मदत केली. त्यामुळे, पिडीत महिलेची व आरोपी कैलास याच्याशी चांगला परिचय झाला होता. तेव्हा आरोपी कैलास याने पिडीत महिलेचा मोबाईल नंबर घेतला. त्यानंतर आरोपी धाकलोडे हा पिडीत महिलेला सारखे फोन करून बोलत होता.

फोनवर बोलताना पिडीत महिलेला म्हणायचा की, तुम्ही खुप सुंदर बोलता, मला तुम्ही आवडले आहात, असे आरोपी कैलास धाकतोडे हा वारंवार फोनवर पिडीत महिलेला बोलायचा. परंतु पिडीत महिला वेळोवेळी म्हणायचे की, माझे लग्न झाले. आहे. मला दोन मुलं आहे. मला यात इंन्ट्रेस नाही. मात्र, आरोपी कैलास धाकतोडे हा पिडीत महिलेला कापड दुकानात येऊन भेटत होता. तो तेथे वारंवार येऊन पिडीत महिलेची व आरोपी कैलास धाकतोडे यांची हळूहळू जवळीकता वाढत गेली. त्यानंतर, पिडीत महिलेच्या घराबाहेर हॉटेलजवळ भेटणे वाढले होते. दि. 4 सप्टेंबर 2020 रोजी पिडीत महिलेचा वाढदिवस असल्याने आरोपी कैलास याने पिडीत महिला काम करत असलेल्या संगमनेरातील कापड दुकानावरून दुपारी 1 वाजता मोटार सायकलवरून एका हॉटेलवर घेऊन गेला. तेथे पिडीत महिलेचा वाढदिवस साजरा केल्यानंतर आरोपी कैलास हा पिडीत महिलेला म्हणाला की, तु मला फार आवडते. अशी लगट करून पिडीत महिलेला आरोपी कैलास रूममध्ये घेऊन गेला. आपण येथेच थांबु असे म्हणून अंगावर हात फिरवुन आरोपी कैलास याने पिडीत महिलेवर बळजबरीने अत्याचार केला.

दरम्यान, पिडीत महिलेला आरोपी कैलास माने ब्लॅकमेल करणे सुरू केले. तो पिडीत महिलेला म्हणाला की हॉटेलवरील घडलेला प्रकार तु कोणाला सांगितला तर मी समाजात तुझी बदनामी करेल, असे म्हणुन आरोपी कैलास याने पिडीत महिलेला घराजवळ सोडले. त्यानंतर आरोपी कैलास याने वारंवार पिडीत महिलेला फोन केले. परंतु पिडीत महिलेने फोन उचलले नाही. मात्र आरोपी कैलास हा पुन्हा कापड दुकानात येऊन बोला की तु बाहेर भेट नाहीतर आपल्या मधील घडलेला प्रकार तुझ्या घरी सांगेन असे बोलून पिडीत महिलेला धमकी देत असे. महिलेने भेटण्यास नकार दिला. त्यानंतर पुन्हा आरोपी कैलास याने पिडीत महिलेला फोन केला व म्हणाला तु भेटायला आली नाही तर झालेला प्रकार तुझ्या पतीस सांगेल. महिलेने पोलीस ठाणे गाठून फिर्याद दाखल केल्याने बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक निकिता महाले करीत आहे.

Web Title: 34-year-old woman Rape in Sangamner city

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here