Home महाराष्ट्र Rape: १२ वर्षीय मुलीवर तिच्याच तीन मित्रांनी केला सामुहिक बलात्कार

Rape: १२ वर्षीय मुलीवर तिच्याच तीन मित्रांनी केला सामुहिक बलात्कार

Rape Case: विरारमध्ये धक्कादायक घटना, तिघांनी केला अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार.

2-year-old girl was gang-rape by her own three friends

वसई: राज्यात अत्याचाराच्या घटनेत वाढ होताना दिसून येत आहे. यातच विरारमध्ये एका १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच तीन मित्रांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात तिच्या मैत्रिणीचाही समावेश आहे.

याप्रकरणी विरार पोलिसांनी तिच्या मैत्रिणीसह तीन जणांना अटक केली असून एक आरोपी फरार आहे.

पीडित मुलगी १२ वर्षाची असून ती विरारमध्ये राहते. मंगळवारी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास मोबाईल दुरुस्त करण्यासाठी ती बाहेर निघाली होती. त्यावेळी तिची मैत्रीण तिला भेटली. आपण फिरायला जाऊ असे सांगून तिने तिला विरार पूर्वेच्या साईदत्त नगर येथील निर्जन ठिकाणी नेले. या ठिकाणी तिच्या मैत्रिणीचे तीन मित्र हजर होते. या तीन मित्रांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. यावेळी तिची मैत्रीणही तिथे हजर होते. रात्री दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली आणि त्यांनी मुलीला पहाटे ५ वाजता घरी सोडले.

दरम्यान, या प्रकरणी विरार पोलिसांनी मुलीच्या आईच्या तक्रारीवरून पीडित मुलीची मैत्रीण तसेच लाला, शुभम सिंग, आणि प्रतीक सिंग या चौघांवर पोक्सो तसेच बलात्काराचा (Raped) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहे.

Web Title: 2-year-old girl was gang-rape by her own three friends

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here