Home अहमदनगर अहमदनगर: मालट्रक व इनोव्हा कार भीषण अपघात- Accident

अहमदनगर: मालट्रक व इनोव्हा कार भीषण अपघात- Accident

Ahmednagar | Parner Accident News:  अपघाताची मालिका सुरूच, इनोव्हा कार ट्रकवर आदळल्याने भीषण अपघात.

Ahmednagar Heavy truck and Innova car accident

पारनेर: जातेगाव घाटात एक भीषण अपघात (Accident ) झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे घडली. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र पाच जण जखमी झाले आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, जातेगाव घाटातील हाँटेल विनायक स्मृती येथुन माल ट्रक (MH 12 FZ 3287) हाँटेल कडून रस्ता ओलांडून पुण्याच्या दिशेला वळत असताना अहमदनगरहून पुण्याच्या दिसेने इनोव्हा कार (MH 43 L 4434) ट्रकवर आदळली.

या अपघात दरम्यान अहमदनगरहून पुण्याच्या दिशेने जात असलेल्या खाजगी बस (MP 41 T 1564) चालकाच्या नजरेस समोर अपघात झाल्याचे निदर्शनास आले.

त्याने प्रसंगासवधान राखून ५० ते १०० फुट बस रस्ता दुभाजकावर ओढली व समोरील कारमधील चार ते पाच व्यक्तीचे प्राण वाचवले. खाजगी बस चालकाने गाडी दुभाजकावर घातली नसती तर ट्रक व लक्झरीच्यामध्ये आलेय कारचे व त्यामधील प्रवाशाचे मोठे नुकसान झाले असते. या अपघातात पाच जण जखमी झाले असुन त्यांना सुपा (Supa) पोलिसांनी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Web Title: Ahmednagar Heavy truck and Innova car accident

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here