संगमनेर तालुक्यातील अल्पवयीन मुलगी तीन महिन्यापासून बेपत्ता
Sangamner Missing News: मुलगी शाळेत जाते असे सांगून घरातून गेली ते परतलीच नाही. तीन महिन्यापासून बेपत्ता.
संगमनेर: खंडेरायवाडी (पिंपळगाव देपा) येथील अल्पवयीन मुलगी तीन महिन्यापासून बेपत्ता झाली आहे. ती चंदनापुरी येथे शिकत आहे. शाळेत जाते म्हणून घरी सांगून गेली अन पुन्हा अद्याप ती घरी परतली नाही. तीन महिन्यापासून बेपत्ता असल्याची फिर्याद मुलीच्या पालकांनी दिली आहे. ९ जून रोजी सकाळी साडे सहा वाजेपासून बेपत्ता असल्याची माहिती पालकांनी दिली आहे.
वैष्णवी सोपान तळेकर असे बेपत्ता झालेल्या मुलीचे नाव असून याबाबत तिचे वडील सोपान दत्तू तळेकर (वय 42, खंडेरायवाडी) यांनी घारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
चंदनापुरी येथील चंदनेश्वर माध्यमिक विद्यालयात शिकत असलेली अल्पवयीन मुलगी 9 जून रोजी शाळेत जाण्याच्या निमित्ताने घरून निघून गेली. मात्र, तेव्हापासून ती घरी परतली नाही. यादरम्यान तीच्या कुटुंबियांनी तीचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, ती आढळून आली नाही.
अखेर पालकांनी घारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरून पोलिसांनी कलम 363 अन्वये घटनेची नोंद घेतली.
सदर मुलीचे वर्णन, आढळून आल्यास संपर्क करण्याचे आवाहन:
मुलीचे वय 15 वर्षे 3 महिने, रंग गोरा, उंची 5.4 इंच, चेहरा-गोल, डोळे-काळे, नाक-सरळ, केस-लांब, काळे तांबूस, अंगात लाल रंगाचा पंजाबी ड्रेस, पायात सॅण्डल असे असून ही मुलगी कोठे आढळून आल्यास घारगाव पोलीस ठाण्यास संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शालुमन सातपुते करीत आहेत.
Web Title: minor girl from Sangamner taluka has been missing for three months