Home क्राईम संगमनेर: काँग्रेसच्या माजी पंचायत समिती सदस्याची डॉक्टरच्या डोक्याला पिस्तूल लावून जीवे मारण्याची...

संगमनेर: काँग्रेसच्या माजी पंचायत समिती सदस्याची डॉक्टरच्या डोक्याला पिस्तूल लावून जीवे मारण्याची धमकी

Sangamner Crime: जीवे मारण्याची धमकी व बदनामी प्रकरणी एकमेकांविरुद्ध गुन्हा दाखल.

Crime Congress Panchayat Samiti member threatens to kill doctor by putting a pistol

संगमनेर: आमच्या नादाला लागले तर तुमच्या खांडोळ्या करू असे म्हणत डोक्याला पिस्तूल लावून संगमनेर तालुका पंचायत समितीचे माजी सदस्य सुरेश थोरात यांनी जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची फिर्याद संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात देण्यात आल्याने पोलिसांनी सुरेश थोरात यांच्यासह ५० ते ६० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. संगमनेर तालुक्यातील पिपरणे येथील व्हेटरनरी डॉक्टर विवेक आस्कर चित्तर यांनी याबाबत फिर्याद दाखल केली आहे.

दिलेल्या फिर्यादीत त्यांनी असे म्हटले आहे की, गुरुवार दिनांक १८ ऑगस्ट २०२२ रोजी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास मी जोर्वे येथे जनावरे तपासण्यासाठी गेलो असता माझे वडील भास्कर चत्तर यांनी मला फोन करून कळवले की आपल्या घरात लोक येऊन धमकावत आहेत. घरात संपूर्ण भितीचे वातावरण झाले आहे. तेव्हा तू लवकर घरी ये. असे कळवल्यावर मी आमच्या घरी गेलो असता घरासमोर ५० ते ६० लोक हातात लोखंडी रॉड, कोयते, कुऱ्हाडी घेऊन उभे होते. त्यांना मी विचारले तुम्ही येथे काय करता तेव्हा त्यांनी मला शिवीगाळ करून दमदाटी केली व माझ्यावर धावून आले तेव्हा मी घाबरून घरात गेलो त्यावेळी घरामध्ये सुरेश जगन्नाथ थोरात (रा. जोर्वे ता. संगमनेर) हा हातात पिस्तूल घेऊन उभा होता माझे आई व भावजयी मोठ्याने रडत होते व त्यांचा हातापाया पडत होते. तेवढ्यात मला योगेश शांताराम जोशी उर्फ पप्पू गुरु व भाऊसाहेब बाबुराव दिघे (दोघे रा. जोर्वे, ता. संगमनेर) यांनी घरात येऊन मला पकडले व त्याच वेळेस सुरेश जगन्नाथ थोरात याने माझ्या डोक्याला पिस्तूल लावला व म्हणाला तुला व तुझा भाऊ स्वानंद याला जीवे मारून टाकेल. तुझा भाऊ कुठे आहे. तो जास्त माजलाय, तुमच्या घरातला कोणी पण जोर्वे गावात दिसल्यास त्यांचा खांडोळ्या करून नदीत फेकून देऊ. आमचे नादी लागू नका. लागले तर तुमचा काटा काढू अशी जीवे मारण्याची धमकी दिली.

त्यावेळी सुरेश थोरात, मुकेश विठ्ठल काकड यानी घरात येऊन माझी आई, भावजयी व अधवडील भास्कर चत्तर यांना वाईट वाईट शिवीगाळ करून, धक्काबुक्की करून परत जाताना तुझ्या भावाला गोळ्या घालू अशी धमकी देऊन निघून गेले. म्हणून माझी या सर्वांनी विरोधात फिर्याद आहे.

संगमनेर तालुका पोलिसांनी या सदर्भात सुरेश जगन्नाथ थोरात, योगेश शांताराम जोशी उर्फ पप्पू गुरु, भाऊसाहेब बाबुराव दिघे, सुनील जगन्नाथ थोरात, मुकेश विठ्ठल काकड (सर्व रा. जोर्वे ता. संगमनेर) यांच्या सह ५० ते ६० अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

चत्तर यांच्याविरुद्धही बदनामीचा गुन्हा दाखल; एकमेका विरुद्ध गुन्हे दाखल माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर सोशल मीडियातून हीन दर्जाची टीका केल्याने प्रकरण वाढले आहे.

स्वानंद आस्कर चत्तर (रा. पिपरणे ता सर्गमनेर) याच्याविरुद्ध देखील सुरेश थोरात व इतर २५ ते ३० जणांनी सगमनेर तालुका पोलीस स्टेशन मध्ये तक्रार अर्ज दिला असून त्या तक्रार अर्ज असे म्हटले आहे की, स्वानंद चल्लर यानी सोशल मीडियातून माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात याच्या विषयी अत्यंत घाणेरडी टीका केली असून लज्जास्पद वाटेल अशी टीका टिप्पर्ण केली. त्यामुळे जोर्वे ग्रामस्थांच्या भावना ‘दुखावल्या आहेत. तरी सदर व्यक्तीला समज देण्यात येऊन माफी मागायला लावावी व कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करण्यात झालेली आहे. या तक्रारीवरून स्वानंद चित्तर याच्याविरुद्ध बदनामीचा गुन्हा दाखल केल्या असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Web Title: Crime Congress Panchayat Samiti member threatens to kill doctor by putting a pistol

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here