Home Accident News Accident: कचरागाडीच्या धडकेत एक ठार

Accident: कचरागाडीच्या धडकेत एक ठार

Ahmednagar Accident:  मनपाच्या वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू.

Accident One killed in a collision with a garbage truck

नगर:  शहरातील कचऱ्याची वाहतूक करणाऱ्या मनपाच्या वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. गुरूवारी सकाळी सक्कर चौक ते आयुर्वेद कॉलेज रस्त्यावर ही घटना घडली. अशोक शिंदे (वय ४०, रा. वाळुंज, ता.नगर) असे मृताचे नाव आहे.

सक्कर चौक ते कोठला परिसर या दरम्यान उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. उड्डाणपुलाच्या कामास वाहतुकीचा अडथळा होत असल्याने सक्कर चौकातून टिळक रोडकडे वाहतूक वळवली आहे. या रस्त्यावर सक्कर चौकाजवळ कचऱ्याची वाहतूक करणाऱ्या गाडीने (एमएच १२ एसएफ ८५२०) दुचाकीस्वाराला धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार अशोक शिंदे मृत झाले. मृत शिंदे होमगार्ड असल्याची माहिती समजली आहे.

अपघाताची माहिती समजल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शिंदे यांचा मृतदेह जिल्हा रूग्णालयात दाखल केला. तेथे शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर शिंदे यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. दरम्यान, दरम्यान, उड्डाणपूलाच्या कामासाठी या रस्त्यावरून वाहतूक वळवली आहे. मात्र अवघड वाहनेही याच रस्त्यावरून जात असल्याने रोजच छोटे-मोठे अपघात होत आहेत. तेथील वाहतुकीच्या नियोजनाबाबत नियोजन करावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

Web Title: Accident One killed in a collision with a garbage truck

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here