संगमनेरे तालुक्यात एकाच रात्री चार घरे फोडली
Sangamner Theft: सर्व घरफोड्यांमध्ये ३ लाख ३४ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला असून २० हजार रुपये किमतीची दुचाकीही चोरीस.
संगमनेर: घारगाव साकूर परिसरामध्ये असणाऱ्या चितळकरवस्ती येथील चार घरे फोडल्याची घटना मंगळवारी (दि. १६ ऑगस्ट) रात्री दहा वाजेच्या नंतर घडली आहे. या सर्व घरफोड्यांमध्ये ३ लाख ३४ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला असून २० हजार रुपये किमतीची दुचाकीही चोरट्यांनी चोरून नेली आहे. आहे.
रखमा भागा चितळकर (वय ४२) व सचिन दिनकर सोनावणे (३३) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, साकूर पठार भागातील चितळकर वस्तीवरील रखमा भागा चितळकर, बापू भागा चितळकर, वच्छाबाई अंबू चितळकर, दत्तू भाऊ चितळकर या चौघांच्या बंद घराचे कुलूप, कडी कोयंडा तोडून अज्ञात चोरांनी घरात प्रवेश करत घरातील सामानाची उचकापाचक करून घरातील सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोख रकमेसह ३ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून पोबारा केला.
वीरभद्र विद्यालयजवळील चायनीज दुकानाजवळ लावलेली सचिन दिनकर सोनवणे यांची वीस हजार रुपये किमतीची दुचाकी (क्र. एमएच १७ बीबी ५००७) चोरट्यांनी चोरून नेली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शालुमन सातपुते व पोलीस नाईक गणेश लोंढे हे करीत आहेत.
Web Title: Sangamner theft Four houses were broken into in the same night