Home अहमदनगर पोलीस कर्मचारी निलंबित:  मुलीस पळून नेऊन तिच्याशी…..

पोलीस कर्मचारी निलंबित:  मुलीस पळून नेऊन तिच्याशी…..

Ahmednagar | Shrirampur News: फिर्यादीवर आणला दबाव : जिल्हा पोलीस प्रमुखांची कारवाई. (police Suspended)

Shrirampur Police personnel suspended

श्रीरामपूर: शहरातील अल्पवयीन मुलीस पळून नेऊन तिच्याशी विवाह करून अत्याचार (abuse) करणाऱ्या एका गुन्ह्यातील आरोपीस शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्याने मदत केली. जिल्हा पोलीसप्रमुख मनोज पाटील यांनी या पोलीस कर्मचाऱ्याने फिर्यादीवर दबाव आणल्याचा ठपका ठेवून त्याला निलंबित केले. बुधवारी ही कारवाई करण्यात आली.

पोलीस कर्मचाऱ्याचे नाव पंकज गोसावी असे आहे. या कारवाईमुळे शहर पोलीस ठाण्याच्या प्रतिमेला धक्का बसला आहे. श्रीरामपूर शहरातील एका तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन तिच्याशी विवाह करून सलग तीन वर्षे अत्याचार केल्याच्या आरोपावरून मुल्ला कटर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे. याप्रकरणात कटर हा अटकेत आहे. कटर याच्यावर गंभीर स्वरुपाचे दोन गुन्हे आहेत. यात अॅट्रॉसिटीचाही समावेश आहे.

आरोपी मुल्ला कटर याला पोलीस नाईक पंकज गोसावी हे मदत करत होते. फिर्यादी पक्षाकडील लोकांवर फिर्याद मागे घेण्याबाबत दबाव आणत होते, अशी तक्रार पीडित मुलीच्या आईने जिल्हा पोलीसप्रमुख मनोज पाटील यांच्याकडे केली होती. त्यानंतर गोसावी याच्या निलंबनाचा आदेश काढण्यात आला. या तक्रारीवरून जिल्हा पोलीस मुख्यालयातून संपूर्ण चौकशी करण्यात आली. पोलीस नाईक पंकज गोसावीवर त्यानंतर कारवाई करण्यात आली. आरोपी हा गुन्ह्यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करत आहे. फिर्यादीवर दबाव आणला जात आहे. त्यातून गोसावी याची मदत घेतली जात होती, असा संशय व्यक्त केला जात आहे. शहर पोलीस ठाणे हे नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत राहिले आहे. लाच स्वीकारल्याप्रकरणी येथे यापूर्वी रंगेहाथ कारवाई होऊन पोलीस कर्मचारी निलंबित झाले आहेत. त्यानंतर हा गंभीर प्रकार समोर आला आहे.

Web Title: Shrirampur Police personnel suspended

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here