संगमनेर तालुक्यात ३९ नवीन करोना बाधित वाढले
संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यात आज बुधवारी ३९ जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. यामध्ये शहरात २२ तर ग्रामीण भागातील १७ जणांचा समावेश आहे.
संगमनेर शहरी भागातून इंदिरानगर येथे २४,५३ वर्षीय महिला, अकोले बायपास रोड येथे २९,२६ वर्षीय पुरुष, २३ वर्षीय महिला, शिवाजीनगर येथे ५० वर्षीय महिला, ६० वर्षीय पुरुष, जनता राजा मैदान ४३ वर्षीय पुरुष, रणकमल निवास भारत नगर येथे २८ वर्षीय महिला, चंद्रशेखर चौक १३ वर्षीय मुलगी, जनता नगर गल्ली नंबर ६ येथे ६८ वर्षीय पुरुष, बाजारपेठ ४५ वर्षीय महिला, वाडेकर गल्ली येथे ३३ वर्षीय पुरुष, म्हसोबा गल्ली इंदिरानगर येथे ६८ वर्षीय महिला, ७७ वर्षीय पुरुष, नवीन नगर रोड येथे ५४ वर्षीय महिला, नेहरू चौक येथे ३४ वर्षीय पुरुष, नवीन नगर रोड सीमा मेडिकल ६५ वर्षीय महिला व ११ वर्षीय मुलगा, ताजणे मळा येथे ४५ वर्षीय महिला, बटवाल मळा येथे ४५ वर्षीय पुरुष, मालदाड रोड येथे ६० वर्षीय पुरुष असे २२ जण बाधित आढळून आले आहेत.
तर ग्रामीण भागातून कसारा दुमाला येथे ३२ वर्षीय पुरुष, घुलेवाडी येथे ४१,५४,२२ वर्षीय पुरुष, डोळासणे येथे ४६ वर्षीय पुरुष, पिंपरणे येथे ३३ वर्षीय पुरुष, राजापूर येथे ५७ वर्षीय पुरुष, गुंजाळवाडी येथे ४८,५३ वर्षीय पुरुष, रणखांब येथे १७ वर्षीय पुरुष, घारगाव येथे ५० वर्षीय महिला, कोल्हेवाडी येथे ३९ वर्षीय महिला, निमगाव जाळी येथे ३८ वर्षीय महिला, २८ वर्षीय पुरुष, आश्वी बुद्रुक येथे २३ वर्षीय महिला, चौरकौठ येथे ५० वर्षीय पुरुष, कासारवाडी येथे ५० वर्षीय महिला असे १७ बाधित आढळून आले आहेत.
Web Title: 39 new Corona affected in Sangamner taluka