अकोले संगमनेर रस्त्याचे काम तातडीने व्हावे या मागणीसाठी आत्मक्लेश आंदोलन
अकोले संगमनेर रस्त्याचे काम तातडीने व्हावे या मागणी साठी कळस बु ग्रामस्थांनी आत्मक्लेश आंदोलन सुरू केले आहे. तालुक्यातील काम जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत ठेकेदाराचे वाहने संगमनेर तालुक्यात होऊ देणार नाही असा निर्धार करण्यात आला आहे.
कळस येथील ग्रामपंचायत सरपंच तथा रिपाइंचे चे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गवांदे, भाजपा चे तालुका सरचिटणीस माजी सरपंच भाऊसाहेब वाकचौरे, शिवसेना तालुका समनव्याक माजी ग्रामपंचायत सदस्य रावसाहेब वाकचौरे, भारतीय जनता युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष ज्ञानदेव निसाळ यांनी संगमनेर अकोले तालुक्याचे सरहद्दीवर प्रवरा नदीच्या पुलावर आत्मक्लेश आंदोलन सुरू केले आहे.
कोल्हार घोटी राज्य महामार्गाचे काम भाजपा सरकारच्या काळात सुरू केले आहे. मात्र काम अतिशय धिम्या गतीने सुरू आहे. अकोले तालुक्यातील गौण खनिज वापरून संगमनेर तालुक्यात काम सुरू आहे. अकोले तालुक्यातील काम बंद आहे. अकोले तालुक्यातील रस्ता खूप खराब झाला आहे. रस्ता वरील वाहन वर्दळीमुळे धुळीचे साम्राज्य पसरले आहे. धुळी मुळे व्यवसाय करणे मुश्कील झाले आहे. याबाबत रस्त्यावर पाणी मारणे चे काम केले जात नाही.
अकोले तालुक्यातील कळस ते अकोले हा रस्ता अतिशय खराब झाला असून खूप खड्डे पडले आहे. त्यामुळे अपघात घडत आहे. रस्त्याला ठिकठिकाणी खोदून ठेवले आहे. अगस्ती कारखान्याचे ऊस वाहतूक सुरू आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. तसेच अनेक लोकानां आपला मार्ग बदलावा लागला आहे. तर अनेकांना पाठीचा व मणके चा आजार बळावला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाला अनेक वेळा निवेदन देऊन ही याबाबद कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी आत्मक्लेश आंदोलन सुरू केलं आहे.
Web Title: Self-torture agitation for urgent work on Akole-Sangamner road