Home महाराष्ट्र मुख्याध्यापकाचा दहावीच्या विद्यार्थिनीवर अत्याचार

मुख्याध्यापकाचा दहावीच्या विद्यार्थिनीवर अत्याचार

headmaster's atrocities on a 10th standard student

महाबळेश्वर: येथील एका  मुख्याध्यापकाने इयता दहावीत शिकत असलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर वारंवार अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या अत्याचार करणाऱ्या मुख्याध्यापकास अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे.

जागतिक महिला दिन संपूर्ण देशभर साजरा झाला. मात्र महाबळेश्वर येथील एका हायस्कूलच्या मुख्याध्यापकाने केलेल्या कुकर्माने संपूर्ण शिक्षण क्षेत्र हादरले आहे.

दिली रामचंद ढेबे वय ५० हा हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक  होता. हायस्कूलमध्ये इयत्ता दहावीत शिकत असलेल्या १५ वर्षीय मुलीवर शाळेच्या प्रयोगशाळेत व हॉलमध्ये वारंवार जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित करून अत्याचार केला.

याबाबत एका जागरूक नागरिकाने चाईल्ड हेल्पलाईन १०९८ या क्रमांकावर तक्रार दाखल केली होती. महाराष्ट पोलिसांनी आलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेत हे प्रकरण चौकशीसाठी महाबळेश्वर पोलीस ठाण्याकडे वर्ग केला.

मागील पाच दिवसांपासून पोलीस याप्रकरणी तपास करीत होते. संशियीत आरोपी व पिडीत विद्यार्थिनीचा पत्ता पोलिसांनी शोधून काढला. पिडीत मुलीला पोलिसांनी विश्वासात घेऊन विचारले असता अत्याचाराच्या बाबतीत पाडा वाचला. मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक ए. बिद्री हे अधिक तपास करीत आहे.

Web Title: headmaster’s atrocities on a 10th standard student

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here