Home पुणे धक्कादायक! धरणाच्या पाण्यात ५ तरुणींचा बुडून मृत्यू

धक्कादायक! धरणाच्या पाण्यात ५ तरुणींचा बुडून मृत्यू

young women drown in dam water

पुणे | Pune: भोर तालुक्यातील नऱ्हे गावात  भाटघर धरणात पोहण्यासाठी उतरलेल्या 5 तरुणींचा बुडून (drown) मृत्यू झाला आहे. गुरुवारी दुपारी बारा वाजता ही घटना घडली. या घटनेनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,  पुण्यातील रहिवासी असलेला एक ग्रुप लग्नाकरिता आला असता भाटघर धरणावर ही दुर्घटना घडली आहे. यावेळी पाच तरुणी धरणाच्या पाण्यात पोहोण्यासाठी उतरल्या. असता  पाण्याचा अंदाज न आल्यामुळे पाचही तरुणींचा बुडून मृत्यू झाला. सुदैवाने एका मुलगी बचावली आहे.  या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. भाटघर धरणात बुडालेल्या पाच तरुणीं पैकी चार जणींचे मृतदेह सापडले आहे.

खुशबू लंकेश राजपूत(वय १९, रा बावधन), चांदणी शक्ती रजपूत (वय २१), पूनम संदीप राजपूत (वय २२, दोघीही रा. संतोषनगर हडपसर पुणे) आणि मोनिका रोहित चव्हाण (वय २३ रा नऱ्हे, ता.भोर) अशी मृतदेह सापडलेल्या मुलींची नाव आहे. तर मनीषा लखन राजपूत (वय २०, रा संतोषनगर हडपसर पुणे) हिचा मृतदेह अद्याप मिळालेला नाही. तिच्या मृतदेह शोधकार्य रात्रीपर्यंत सुरू होते.

Web Title: 5 young women drown in dam water

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here