Home अहमदनगर Accident:  कंटेनरची धडक बसल्याने कामगाराचा मृत्यू

Accident:  कंटेनरची धडक बसल्याने कामगाराचा मृत्यू

Worker dies after being hit by a container Accident 

पारनेर | Parner:  सुपा औद्योगिक वसाहतीतील पी. जी. कंपनीमध्ये माल भरण्यासाठी आलेला कंटेनर मागे घेत असताना दरवाजा उघडणार्‍या एका कामगाराचा धडक (Accident) लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात  मंगळवारी (दि.17) पहाटेच्या सुमारास घडला.

नवीन ललई ( वय 21) असे या मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. याबाबत संकेत भीमराव कुंभारकर (मूळ रहवाशी बीड, हल्ली मुक्कामी सुपा) यांनी सुपा पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे.  दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. मंगळवारी पहाटे 2.30 वाजता. कंटेनर चालक दरबता मुजुमदार (35 रा. दिनाजपूर , पंश्चिम बंगाल) हा कंटेनर क्रमांक (एम एच 12 के पी 9852) घेऊन सुपा औद्योगिक वसाहतीतील पी. जी. कंपनी मध्ये माल भरण्यासाठी आला होता. तेथे नवीन ललई माल भरण्याचे काम करत होता. माल भरण्यासाठी कंटनेर मागे घेत असताना नवीन ललई हे कंपनीची भिंत व कंटेनरमध्ये अडकले. छातीत कंटेनरचा दरवाजा जोरात लागल्याने ललाई जागेवरच कोसळले. त्यांना ताबडतोब पारनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी मयत घोषित केले.  याप्रकरणी कंटेनर चालक दरबता मुजुमदार यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार एस. डी. ओहळ करत आहेत.

Web Title: Worker dies after being hit by a container Accident 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here