Home नागपूर नागपूर हादरले! विचित्र पद्धतीने हत्या करून मृतदेह नाल्यात फेकला- Murder Case

नागपूर हादरले! विचित्र पद्धतीने हत्या करून मृतदेह नाल्यात फेकला- Murder Case

Murder in a strange manner and threw his body in the drain

नागपूर | Nagpur Crime : नागपूरमध्ये हत्येचं सत्र सुरूच आहेवारंवार होणाऱ्या गुन्ह्यांमुळे नागपूर हादरलं आहे. आता नागपूरमध्येच विचित्र पद्धतीने हत्या (Murder)  करून मृतदेह नाल्यात फेकण्याची धक्कादायक घटना घडली आहे. कळमना पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही धककादायक घटना घडली आहे. या घटनेने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. गोपाल लगोटे असे मयत इसमाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंद केला आहे

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर परिसरात एकाची विचित्र पद्धतीने हत्या करून मृतदेह फेकण्याची घटना घडली आहे. कळमना पोलीस स्टेशनच्या हद्दीत कामठी रोडकडे जाणाऱ्या शेताजवळील कोरड्या नाल्यात मृतदेह आढळून आला आहे.  या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. विशेष म्हणजे या मृतदेहाच्या गुप्तांगाला दोरी बांधल्याचं दिसून आलं. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. त्यानंतर पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरात मृतदेहाविषयी चौकशी केली असता ओळख पटली नाही मात्र काही वेळानंतर पोलिसांच्या प्रयत्नाला यश आलं. रात्री उशिरा पोलिसांना मृतदेहाची ओळख पटली असून  गोपाल लगोटे असे मयत इसमाचे नाव आहे. गुप्तांगाला दोरी बांधून मृतदेह आढळल्याने हत्या कशामुळं केली याची  पोलीस कसून चौकशी करीत आहे.. सदर हत्या  अनैतिक संबंधातून झाल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. नेमकी हत्या का व कोणी केली हे पोलिसांच्या अंतिम तपासानंतरच स्पष्ट होईल. पोलीस तपास सुरु आहे.

Web Title: Murder in a strange manner and threw his body in the drain

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here