Home अकोले अकोले तालुका दुष्काळी जाहीर व्हावा यासाठी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल

अकोले तालुका दुष्काळी जाहीर व्हावा यासाठी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल

अकोले: अकोले तालुका दुष्काळी जाहीर व्हावा यासाठी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल

अकोले: शासनाच्या वतीने दुष्काळ जाहीर करण्यात आला. अहमदनगर जिल्ह्यातील ११ तालुक्यांमध्ये प्राथमिक अहवालामध्ये जिल्हाधिकारी राहुल दिवेदी यांनी जाहीर केला. परंतु यात अकोले तालुक्याचा समावेश करण्यात आलेला नाही. सध्याच्या स्थितीला पाहता ही बाब चिंताजनक आहे. त्यावर उपाय योजना करण्यासाठी अकोले तालुक्यात दुष्काळ जाहीर व्हावा यासाठी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आली आहे.

You May Also Like: Bollywood Actresses Priyanka Chopra, Mallika successful adult Movie

संगमनेर येथील रहिवासी असलेले औरंगाबाद उच्च न्यायालयातील वकील अॅड. राजेंद्र कुटे यांनी ही याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्ते राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष मिनानाथ पांडे, अकोले तालुका पत्रकार संघाचे संस्थापक व अध्यक्ष विजय पोखरकर, शिवसेनेचे तालुका प्रमुख मच्छिंद्र धुमाळ, अॅड. शांताराम वाळूंज, भाऊसाहेब गोडसे, अॅड. अनिलकुमार आरोटे यांच्यावतीने औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आलेली आहे.

या याचिकेत अॅड. अनिलकुमार आरोटे यांनी गुरुवारी शपथपत्र दाखल केले आहे. ही याचिका दाखल केल्याने अकोले तालुक्यातील शेतकरी ,कामगार, विद्यार्थी व पालकांना दुष्काळ जाहीर होण्याच्या दृष्टीने न्यायालयाकडून दिलासा मिळेल अशी अपेक्षा निर्माण झाली आहे.   

Website Title: A petition for Aurangabad Bench to declare Akole Taluka Drought


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.  किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा



प्रमोटेड बातम्या:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here