Home अहमदनगर रामवाडी(मालुंजे): रामवाडीच्या शाळेत दिवाळी फराळ पार्टी

रामवाडी(मालुंजे): रामवाडीच्या शाळेत दिवाळी फराळ पार्टी

रामवाडीच्या शाळेत दिवाळी फराळ पार्टी 

आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामवाडी(मालुंजे) शाळेत पालक सहभागातून मिष्टान्न भोजन या उपक्रमाअंतर्गत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांसाठी दिवाळी फराळ पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या माजी मुख्याध्यापिका ज्योती दिवे मॅडम यांच्या सहकार्यातून चिवडा, शेव व शंकरपाळे हे फराळ देण्यात आले.
विद्यार्थ्यांनी मोठ्या आनंदाने फराळाचा आस्वाद घेतला.
याप्रसंगी विद्यार्थ्यांना दिपावलीचे महत्व सांगून दिपावलीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. विद्यार्थ्यांनीही एकमेकांना व शिक्षक व पालकांना  शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी व्यवस्थापन समिती अध्यक्ष मनीषा खरात, सदस्य योगिता खरात, पालक अनिल दिवे , दिपक खरात यांसह विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपाध्यापिका सुरेखा आंधळे, मुख्याध्यापक केशव घुगे यांनी परिश्रम घेतले.

Website Title: Ramvadi z p School diwali parti in malunje


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.  किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा



प्रमोटेड बातम्या:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here