Home राष्ट्रीय पोस्ट ऑफिसमध्ये स्वस्त सोने खरेदीची सुविधा

पोस्ट ऑफिसमध्ये स्वस्त सोने खरेदीची सुविधा

पोस्ट ऑफिसमध्ये स्वस्त सोने खरेदीची सुविधा

नवी दिल्ली: दिवाळीसारख्या सणामध्ये सोने खरेदी हि शुभ मानली जाते व त्यामुळे अनेक लोक सोने खरेदी करत असतात अशात पोस्ट ऑफिस मध्ये स्वस्त सोने खरेदी करण्याची संधी चालून आली आहे. सरकारची सुवर्ण रोखे योजना २०१८-१९ च्या अंतर्गत कोणीही व्यक्ती स्वस्ताच सोने खरेदी करू शकणार आहे. त्याचप्रमाणे त्यावर व्याजही मिळणार आहे. तसेच कर सवलतीचाहि लाभ त्या व्यक्तीला मिळणार आहे.

सरकारने रिझर्व बँकेच्या समवेत सुरु केली आहे.  बॉंडची विक्री बँका, टपाल कार्यालये तसेच मान्यताप्राप्त शेअर बाजार म्हणजे नॅशनल स्टोक एक्सचेंज, बी. एस.इ . लिमिटेड यादवारे करता येईल या योजनेचा पहिला टप्पा १९ ऑक्टोबरला बंद केला होता. आता ५ नोव्हेंबरला पुढील टप्पा असून तो ९ नोव्हेंबर पर्यंत चालू असणार आहे. त्यानंतर २४ ते २८ डिसेम्बर त्यानंतर पुढील वर्षामध्ये १४ ते १८ जानेवारी २०१९ व ४ ते ८ फेबुवारी २०१९ असणार नाही.

 भारत बुलियन अॅण्ड जेव्लेर्स असोशिएशन लिमिटेड यांच्याकडून गेल्या तीन दिवसांच्या ९९९ शुद्ध सोन्याच्या देण्यात आलेल्या सोन्याच्या किमतीच्या आधारे बॉंड ची किमंत रुपयांमध्ये निश्चित केलेली आहे. सुरुवातीला वार्षिक अडीच टक्के व्याज मिळणार आहे. नोव्हेंबर २०१५ मध्ये या योजनेची सुरुवात झाली होती. भौतिक स्वरूपात सोन्याची मागणी कमी करून सोने खरेदी करून सोने खरेदी मध्ये असणारी उपयोगी अशी बचत व्हावी व घरामध्ये सोने खरेदी करून ठेवण्याऐवजी बॉंड मध्ये गुंतवणूक करावी की त्याचाही फायदा लोकांना व्हावा असा उद्देश यामध्ये आहे. यादवारे तुम्ही सुवर्ण रोखे खरेदी करता व करही वाचवू शकता. तसेच बॉंडच्या आधारावर तुम्ही कर्जही घेऊ शकणार आहात.

You May Also Like: Bollywood Actresses Priyanka Chopra, Mallika successful adult Movie

वैशिष्ठे: १) बॉंड पेपर इलेक्ट्रॉनिक स्वरूपात आहे.

२) सोने लॉकर मध्ये ठेवावे लागते तसेही नाही.

३) लॉकरचा खर्च वाचतो.

४) सोन्याच्या किमतीत घट झाल्यास गोल्ड बॉंड नकारात्मक परतावा देतो.

५) गुंतवणूक कालावधी आठ वर्षाचा आहे.

6) पाच वर्षानंतरही तुम्ही पैसे काढू शकता.

७) बॉंड वर बँकेचे कर्जही घेऊ शकाल.

८) पोस्टाच्या राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रासारखे स्वरूप.

Website Title: Government Suvarn Rokhe Yojana


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.  किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा



प्रमोटेड बातम्या:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here