Home अकोले अकोले: अभिनवमध्ये २०१९ चे स्वागत करण्यासाठी स्नेहमेळावा

अकोले: अभिनवमध्ये २०१९ चे स्वागत करण्यासाठी स्नेहमेळावा

अकोले(प्रा. अनिल बेंद्रे): अभिनवमध्ये २०१९ चे स्वागत करण्यासाठी स्नेहमेळावा

अकोले(प्रा. अनिल बेंद्रे): शिक्षक हे बहुआयामी व्यक्तिमत्व असते , शिक्षक हे चतुरस्र व्यक्तिमत्व असते . आपण मशीनप्रमाणे नव्हे तर मुलांची माता, पिता , शिक्षक या भूमिका म्ंनापासुन निभावली पाहिजे. विद्यार्थ्याशी नाते जोडण्यासाठी आवश्यक असलेली कलात्मकता , गुणात्मकता, ऊर्जा मिळावी, वाढावी यासाठी सहभाग वाढावा यासाठी शाबासकीची थाप देण्यासाठी व आनंदाने एकत्र येण्याचा क्षण म्हणजे स्नेह मेळावा आहे असे प्रतिपादन अभिनव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मधूकरराव नवले यांनी काढले. अभिनव शिक्षण संस्थेमध्ये २०१८ या वर्षाला निरोप देण्यासाठी व २०१९ चे स्वागत करण्यासाठी आयोजित स्नेह मेळाव्यात उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
कर्यक्रमाची सुरुवात स्वागतगीताने झाली. त्यानंतर सी.बी.एस.ई च्या डायरेक्टर प्राचार्या जयश्री देशमुख यांनी प्रास्ताविक केले. यावेळी विठ्ठलमामा नाईकवाडी यांचा वाढदिवसानिमित्त विशेष सत्कार करण्यात आला तसेच नुकतेच रोटरी क्लब च्या वतीने ‘राष्ट बांधणीचे शिल्पकार’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले अभिनव चे शिक्षक राधाकीसन मालूजकर यांचाही सत्कार करण्यात आला. सांज दीपावली व संस्कृतिक महोत्सवात सहभाग व उल्लेखनीय काम करणार्‍या सर्व विद्यार्थ्यांना , कर्मचार्‍यांना यावेळी कौतुक करून प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देवून गौरविण्यात आले. त्यानंतर सर्वांनी आदिवासी होस्टेलच्या विद्यार्थ्यांसमवेत स्नेहभोजन केले. यावेळी मंदाताई नवले सर्व विभागांचे प्राचार्य, विभागप्रमुख , शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमंत मंडलिक यांनी केले तर आभार प्राचार्य लक्ष्मीकांत आहेर यांनी मानले.

बातमी: संगमनेर: सात वर्षीय चिमुरडीवर अत्याचार

Website Title: Abhinav College Akole Affection match


संगमनेर न्यूज | Sangamner News | वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक कराप्रमोटेड बातम्या:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here