वाखारी येथे सांस्कृतीक कार्यक्रम संपन्न.
विद्यार्थ्यांनी जिंकली उपस्थितांचे मने.
पिंपळगाव नाकविंदा/ प्रतिनिधी -लहान मुल म्हणजे मातीचा गोळा आकार दयावा तशी मृत घडले. म्हणूनच विद्यार्थ्यांच्या सुप्त कला गुणांना वाव देण्यासाठी अकोले तालुक्यातील वाखारी(पाडोशी) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच तरुण मित्र मंडळ यांचे सयुक्त विद्यमाने सांस्कृतीक कार्यक्रम आनंदमय वातावरणात संपन्न झाले.
याप्रसंगी पंचायत समितीच्या सभापती रंजना मेंगाळ, उपसभापती मारूती मेंगाळ, जिल्हा परिषदेचे सदस्य डॉ. किरण लहामटे, माजी विक्रीकर उपायुक्त मारूती डगळे,बाभळेश्वर विद्युत वितरण कंपणीचे पंढरी साबळे, जेष्ठ कार्यकर्ते बाळासाहेब साबळे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ढवळा साबळे, उपाध्यक्ष बाळु नाडेकर, ठाकर समाजाचे उपाध्यक्ष रामदास गावंडे, सिन्नर राज्यपरिवहन मंडळाचे काळु साबळे, सरपंच प्रकाश साबळे, उपसरपंच देवराम साबळे यांचे प्रमुख उपस्थितीत दिपप्रज्वलन तसेच नारळ वाढवून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक बहिरू साबळे, शिक्षक अनिल गुंजाळ, गोविंद साबळे, रमेश साबळे, नंदु साबळे, कारभारी साबळे, नितीन साबळे, राजु साबळे, बाळू सांगडे, दिपक साबळे, किसन साबळे, विठ्ठल साबळे, रामा साबळे, चिंतामन साबळे, उत्तम डगळे यांसह बहुसंख्या ग्रामस्थ उपस्थित होते.
याप्रसंगी सभापती रंजना मेंगाळ यांनी सुंदर क्षणाची वाट पाहण्यापेक्षा आलेला क्षण सुंदर करा. त्यासाठी शालेय उपक्रम महत्वाचे असल्याचे प्रतिपादन केले.
जिल्हा परिषद सदस्य डॉ. किरण लहामटे यांनी एकत्र रहा, एकमेकांचा आदर करा. आपल्या मनातील वाईट विचार समाप्त करून चांगल्याचा स्विकार करा. असे प्रतिपादन केले.
उपसभापती मारूती मेंगाळ यांनी स्वतःचे अस्तित्व निर्माण करा तेव्हाच जग तुमचा आदर करेल. त्यासाठी शाळेतील संस्कार महत्वाचे असल्याचे मत प्रतिपादन केले.
माजी विक्रीकर उपायुक्त मारूती डगळे यांनी सकारात्मक विचारसरणी असेल तर प्रगती होते. त्यासाठी एकमेकांना मदत करा यातच आयुष्याचा खरा आनंद आहे. असे प्रतिपादन केले.
जेष्ठ कार्यकर्ते बाळासाहेब साबळे यांनी नाती खुप अनमोल आहेत ती जपा. विदयार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्नशिल रहा असे मत व्यक्त केले.
सांस्कृतीक कार्यक्रमांत विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत,पवाडे, रेकॉर्ड डान्स,नाटीका, समुह नृत्य, लावणी, शिळ्या बातम्या यांसारख्या कार्यक्रमातुन उपस्थितांचे मने जिंकली. प्रेक्षकांनीही आर्थिक स्वरूपात कलाकारांचे भरभरून कौतुक केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. सचिन लगड यांनी केले.तर पुनाजी साबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुनिल लोखंडे, आप्पा साबळे, सोमनाथ साबळे, ऋतीक साबळे, संतोष साबळे, संतोष भांगरे, पुनाजी साबळे, गणपत भांगरे, दौलत साबळे, विजय साबळे, शंकर साबळे, नाथु गोडे यांसह तरूण मित्रमंडळाने परिश्नम घेतले.
Website Title: Vakhari Cultural program concludes
संगमनेर न्यूज | Sangamner News | वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.
आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436
मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा
Get Latest Marathi News, Marathi Batmya Today Live & Marathi News Live from Politics, Sports,Entertainment News, Sangamner Taluka News, Akole Taluka News, Marathi Batmya Live and मराठी बातम्या लाइव from all cities of Maharashtra.
प्रमोटेड बातम्या: