Home अकोले राजूर: निरपेक्षपणे काम करून समाजाला दिशा द्यावी- प्रा. टी.एन.कानवडे

राजूर: निरपेक्षपणे काम करून समाजाला दिशा द्यावी- प्रा. टी.एन.कानवडे

राजूर: प्रसार माध्यमांनी निरपेक्षपणे काम करून समाजाला दिशा द्यावी- प्रा. टी.एन.कानवडे

राजूर: भारतीय लोकशाहीत घटनेने व्यक्ती स्वातंत्र्य, भाषण स्वातंत्र्य तसेच मत स्वातंत्र्य दिले आहे. त्यामुळे भारतीय लोकशाही हि जगातील मोठी व सर्वश्रेष्ठ व्यवस्था आहे व या लोकशाहीतील विविध प्रश्नाची सोडवणूक करण्यामध्ये प्रसार माध्यमांची भूमिका अतिशय महत्वाची आहे. प्रसार माध्यमांनी सामाजिक प्रश्नांनाची सोडवणूक करण्यासाठी पुढे यावे असे मत किसन भाऊ हासे (संपादक युवावार्ता) यांनी व्यक्त केले. ते राजूर येथील अँड. एम. एन. देशमुख महाविद्यालयात आयोजित केलेल्या वादविवाद स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

आजच्या आधुनिक युगात वाढत्या तंत्रज्ञानाबरोबरच वर्तमानपत्रे वाचकांची संख्या देखील वाढत गेली. तसेच देशाला आकार देण्याचे कार्य आजची प्रसारमाध्यमे करीत आहे. प्रसारमाध्यमांनी अर्थप्राप्ती बरोबरच प्रश्नांची उकल करून देशाच्या विकासास हातभार लावला पाहिजे व जनतेचा विश्वास संपादन केला पाहिजे असे ही विचार त्यांनी मांडले.

अध्यक्षस्थानी प्रा. टी.एन. कानवडे(सचिव, सत्यानिकेतन संस्था,राजूर) हे उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात प्रा. कानवडे म्हणाले कि, प्रसार माध्यमांनी निरपेक्षपणे काम करून समाजाला दिशा द्यावी व सामाजिक प्रश्नांची सोडवणूक करावी, या कार्यक्रम प्रसंगी एस.टी. एलमामे, रामशेठ पन्हाळे यांनी आपले विचार मांडले. प्रा. डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी मान्यवरांचे स्वागत व सत्कार केला तर प्रास्ताविक प्रा. एस. बी. शिंदे यांनी केले. याप्रसंगी डॉ. भाऊसाहेब देशमुख व प्रा. चिंतामण धिंदळे, प्रा. व्ही. बी. एलमामे व विद्यार्थी उपस्थित होते. आभार प्रा. व्ही.बी. येलमामे यांनी मानले तर सुत्रसंचालन प्रा. लहामगे यांनी केले.     

बातमी- संगमनेर: कार अडवून दोघांना जबर मारहाण

Website Title: Rajur prof t n kanawade Provide direction to the community


संगमनेर न्यूज | Sangamner News | वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा



प्रमोटेड बातम्या:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here