Home अकोले अभिनवच्या ध्रुवी खताळ ची नोंद  इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये 

अभिनवच्या ध्रुवी खताळ ची नोंद  इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये 

अभिनवच्या ध्रुवी खताळ  ची नोंद  इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये 

अकोले :अभिनव शिक्षण संस्थेच्या वसुंधरा अकॅडेमीची विद्यार्थीनी कु. ध्रुवी अरुण खताळ    हिची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नोंद झाली.  नृत्य स्पर्धांमध्ये २०१५ ते २०१८ या तीन वर्षांत सर्वाधिक म्हणजेच १३० पारितोषिके व १८ पदके अगदी कमी वयात मिळविल्याबद्दल धृवीची नोंद    इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये  झाली. एवढे यश  मिळविणारी धृवी अवघे ८ वर्षे वयाची आहे. अभिनव शिक्षण संस्थेच्या वसुंधरा अकॅडेमी मध्ये ती इयत्ता दुसरीत शिकत आहे .
आतापर्यंत ध्रुवी ला अनेक राष्ट्रीय ,तसेच  आंतर राष्ट्रीय पातळीवर डान्स स्पर्धांमध्ये यश मिळालेले आहे. सह्याद्री वाहिनीवर सुरु  असलेल्या दम दमा दम या रियालिटी शो मध्ये देखील ती विजेती ठरलेली आहे.
तिच्या या यशाबद्दल अभिनव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मधुकरराव नवले यांच्या शुभहस्ते व  सी.बी.एस.ई.च्या डायरेक्टर प्राचार्या जयश्री देशमुख, मारुतीराव कोते अभिनव पब्लिक स्कूलच्या प्राचार्या अल्फोन्सा डी.,  वसुंधरा अकॅडेमिचे प्राचार्य लक्ष्मीकांत आहेर, एम.बी.ए. चे प्रा. अनिल बेंद्रे , वसुंधरा अकॅडेमिच्या समन्वयक  राधिका नवले  यांच्या उपस्थितीत  ध्रुवी ला तसेच तिचे वडील डॉ. अरुण खताळ व आई   डॉ. शितल खताळ यांना  सन्मानित करण्यात आले.
यावेळी अभिनव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मधुकरराव नवले यांनी  विद्यार्थ्यांची आवड जपत त्यांना संधी उपलब्ध करून दिल्यास धृवी सारखे यश मुलांना मिळते असे प्रतिपादन केले व  कु. धृवीचे कौतुक करून तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Website Title: Abhinav’s Dhruvvi Khatal records the India Book of Records


Latest: Sangamner NewsAkole News, And Entertainment News


अहमदनगर जिल्ह्यातील No-1 अप्प: आजच Google Play Store ला जाऊन डाउनलोड करा – Sangamner Akole News.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here