Home अकोले अकोले: MPSC मध्ये राज्यात अनुसूचित जमाती मधून प्रथम कु.सुजाता पंढरीनाथ वायळ

अकोले: MPSC मध्ये राज्यात अनुसूचित जमाती मधून प्रथम कु.सुजाता पंढरीनाथ वायळ

शासकीय माध्यमिक आश्रमशाळा केळी कॊतुळ येथे गुणवंत विद्यार्थीचा सत्कार सभारंभ झाला संपन्न.

अकोले: प्रथम सरस्वती प्रतिमा पूजन होऊन सदर कार्यक्रमास सुरुवात झाली.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक V.M देशमुख सर यानी केले. यावेळी सत्कारमुर्ती कु.सुजाता पंढरीनाथ वायळ-(या शाळेची माजी विद्यार्थीनी व MPSCमधून  राज्यात अनुसूचित जमाती मधून प्रथम) हिचा शाळेच्या व शालेय व्यावस्थापन समिती च्या वतीने सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे आध्यक्षस्थानी श्री.कोंडीबा गोडे गुरुजी हे  होते.त्यानंतर श्री.आवारी सर श्री.केसकर सर तसेच व्यासपीठावरील सर्वच मान्यवरांची मनोगते झाली.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री.दत्तात्रय बोराडे(सदस्य,प.स  अकोले)श्री.सिताराम वायळ सर(सदस्य,शाळा व्यवस्थापन समिती)श्री.नाना शिरसाठ(उप आध्यक्ष SMC)माजी प्राचार्य श्री. देशमुख सर.माजी मुख्याध्यापक श्री.डावखर सर.गणेश खरात सर हे सर्व उपस्थित होते.तसेच सत्कारमूर्तीचे आई-वडील व ग्रामस्थ मोठ्यासंख्येन हजर होते.शाळेचे प्रभारी प्राचार्य श्री.शिंदे सर.श्री.म्हशाळ सर तसेच सर्वच शिक्षक व वर्ग चार कर्मचारी यांनी अनमोल सहकार्य केले.सूत्रसंचलन श्री.खेडकर सर यांनी केले व आभारप्रदर्शन श्री. भोरे सर यांनी केले.त्यानंतर सदर कार्यक्रमाची सांगता झाली.

Website Title: Sujata Pandharinath wayal


Latest: Sangamner NewsAkole News, And Entertainment News


अहमदनगर जिल्ह्यातील No-1 अप्प: आजच Google Play Store ला जाऊन डाउनलोड करा – Sangamner Akole News.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here