अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीस अटक
मनोरुग्ण आई घरातून निघून गेल्याने तिचा शोध घेण्यासाठी निघालेल्या १० वर्षीय मुलीवर अत्याचार (abused) केल्याची घटना.
वाळूज: मनोरुग्ण आई घरातून निघून गेल्याने तिचा शोध घेण्यासाठी निघालेल्या १० वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना सोमवारी तिच्या मावशीमुळे उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपी दिलीप वाघील्या पवार याला अटक करण्यात आली आहे.
पीडिता मनोरुग्ण आई, दोन बहिणी व एका लहान भावासह राहतात. वडील मयत झाले असून आई गतिमंद आहे. त्यामुळे पीडिता ही गतिमंद आईसह आजोबाच्या घरी राहते. आई गतिमंद असल्यामुळे ती गावात फिरत असते. शुक्रवारी आई घरातून बाहेर गेली मात्र ती परत न आल्याने पीडिता आईला शोधत असताना रात्री ८ वाजेच्या सुमारास वाळूज येथील कमळापूर कमानीजवळ आरोपी दिलीप वाघिल्या पवार भेटला. त्याने तिला विचारले असता तिने सांगितले की, मी आईला शोधते. त्यामुळे तो तिला म्हणाला की, चल आपण दोघं मिळून तुझ्या आईला शोधू. त्यानंतर मुलीच्या आईला पंढरपूर येथून शोधून वाळूज येथे येत असताना हनुमान नगर येथील रस्त्यातील एका टपरीजवळच रात्री १२ वाजेच्या सुमारास ते झोपले. रात्री अंदाजे दीड वाजेच्या सुमारास आरोपीने १० वर्षीय चिमुकलीला गळा घोटून जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार केला. तसेच ही घटना कोणाला सांगितल्यास मारून टाकण्याची धमकी दिली. त्यामुळे तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. मात्र सोमवारी तिची मावशी घरी भेटण्यासाठी आली असता तिच्या वागण्या बोलण्यावरून संशय आल्याने तिच्या नातेवाईकांनी तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता हा सर्व प्रकार उघडकीस आला.
याप्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अमोल ढोले करीत आहे.
Web Title: Abusing a Minor Girl Accused Arrested
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App