Home Accident News कारला फरपटत नेले, डॉक्टर दाम्पत्य ठार

कारला फरपटत नेले, डॉक्टर दाम्पत्य ठार

Accident: भरधाव हायवा ट्रकने कारला समोरून टक्कर दिली. ही धडक इतकी भीषण होती की यामध्ये हायवाने कारला अर्धा किमीपर्यंत फरफटत नेले. या अपघातात कारमधील पती-पत्नी ठार.

Accident Car overturned, doctor couple killed

चंद्रपूर: मार्गावरील शेंबळ गावाच्या शिवारात भरधाव हायवा ट्रकने कारला समोरून टक्कर दिली. ही धडक इतकी भीषण होती की यामध्ये हायवाने कारला अर्धा किमीपर्यंत फरफटत नेले. या अपघातात कारमधील पती-पत्नी ठार झाले. हे दोघेही वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते.

अतुल गौरकार (३४) व त्यांच्या पत्नी अश्विनी (३१, रा. वणी) अशी मृतांची नावे आहेत. हा अपघात मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास घडला.

कारमध्ये दोघेही अडकून होते. घटनास्थळी धावून आलेल्या लोकांनी त्यांना मोठ्या कसरतीचे बाहेर काढले. मात्र, अश्विनी यांचा जागीच मृत्यू झाला होता. जखमी अतुल गौरकार यांना रुग्णालयात हलविताना वाटेत

त्यांचीही प्राणज्योत मालवली. मृत दाम्पत्याला एक वर्षाचा शेरवीर हा मुलगा आहे. मृत अश्विनी या वणी येथील उपजिल्हा रुग्णालयात काही दिवसांपूर्वीच वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झाल्या होत्या. त्यांनी एक दिवसाचीच सेवा दिली होती. वरोरा पोलिसांनी ट्रक चालक अभिमन्यू साकेत (२५, रा. मूळ मध्य प्रदेश) याला अटक केली आहे.

Web Title: Accident Car overturned, doctor couple killed

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here