Home अकोले अकोले: विजेच्या धक्क्याने तरुण वायरमन ठार

अकोले: विजेच्या धक्क्याने तरुण वायरमन ठार

Akole News: गावातीलच वीज वितरण कंपनीत बाह्यस्रोत कर्मचारी म्हणून कार्यरत असलेला वायरमन वीज ट्रान्स्फॉर्मरचे काम करीत असताना अचानक विजेच्या धक्क्याने (electric Shock) मृत्यू झाल्याची घटना.

Young wireman killed by electric Shock

अकोले: अकोले तालुक्यातील धामणगाव आवारी येथे गावातीलच वीज वितरण कंपनीत बाह्यस्रोत कर्मचारी म्हणून कार्यरत असलेला वायरमन वीज ट्रान्स्फॉर्मरचे काम करीत असताना अचानक विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. पंकज एकनाथ आवारी (वय २६) असे या वायरमन कर्मचार्याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पंकज एकनाथ आवारी हा अविवाहित तरुण गावातील पाचवड शिवार भागातील डीपीचे जंप जोडण्याचे काम करीत होते. वीज रात्री येईल असे अपेक्षित असल्याने ते काम करीत होते, पण विद्युत वीज अचानक आल्याने त्यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. सर्व वीज वितरण कंपनीच्या सेवकांना सुरक्षा साधनांचा वापर करून काम करण्याच्या वारंवार सूचना दिल्या जातात. दुर्दैवाने वीरगाव व धामणगाव येथे दोन अपघात घडले, भविष्यात असे अपघात टाळण्यासाठी सतर्क राहण्याच्या सूचना वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांना दिल्या असल्याचे वीज वितरणचे उपविभागीय अभियंता ज्ञानेश बागुल यांनी सांगितले.

गेल्या पंधरवड्यात अशीच एक घटना तालुक्यातील वीरगाव येथे घडली यात बाहक्स्रोत कर्मचारी म्हणून कार्यरत असलेला वायरमन भाऊराव आंबरे यांचे निधन झाले.

Web Title: Young wireman killed by electric Shock

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here