Home अहमदनगर अहमदनगर: महाविद्यालयीन विद्यार्थिनीचे अपहरण

अहमदनगर: महाविद्यालयीन विद्यार्थिनीचे अपहरण

Ahmednagar News: बारावीचा पेपर देण्यासाठी आलेल्या ग्रामिण भागातील अल्पवयीन महाविद्यालयीन विद्यार्थिनीचे अपहरण (Abduction).

Ahmednagar Abduction of college girl

राहुरी: राहुरी महाविद्यालयात बारावीचा पेपर देण्यासाठी आलेल्या ग्रामिण भागातील अल्पवयीन महाविद्यालयीन विद्यार्थिनीचे अपहरण करण्यात आल्याची घटना घडली असून या घटनेमुळे पालक विद्यार्थी वर्गात खळबळ उडाली आहे.

राहुरी तालुक्यातील अल्पवयीन विद्यार्थिनी आपल्या वडिलांबरोबर 18 मार्च रोजी राहुरी महाविद्यालयात 12 वीचा पेपर देण्यासाठी आली होती. त्यावेळी त्या विद्यार्थिनीच्या वडिलांनी कॉलेजच्या गेटमध्ये तिला सोडून ते घरी निघून गेले व पेपर सुटल्यावर तिचे वडील सायंकाळी सहा वाजता तिला घेण्यासाठी महाविद्यालयात आले. मात्र ती आलीच नाही तेव्हा शिक्षकांकडे चौकशी केली असता ती पेपरला आलीच नसल्याचे समजले.

त्यामुळे वडिलांनी महाविद्यालय परिसरात तिचा शोध घेतला नातेवाईकांकडे शोध घेतला परंतु ती आढळून आली नाही. त्यामुळे आपल्या मुलीला अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी पळवून नेले आहे अशी त्या मुलीच्या वडिलांची खात्री झाल्यामुळे त्यांनी अखेर राहुरी पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध गु.र.नं. 298/2023 भादवि कलम 363 प्रमाणे अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा अधिक तपास राहुरी पोलीस करीत आहे.

Web Title: Ahmednagar Abduction of college girl

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here