Home क्राईम स्कूल बस वाहकाचा अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार

स्कूल बस वाहकाचा अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार

मुलावर अनैसर्गिक अत्याचार (unnatural abused) केल्याप्रकरणी एका खासगी शाळेच्या बस वाहकाला निर्मलनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

Unnatural abuse of minor by school bus conductor

मुंबई : वांद्रे येथे ११ वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी एका खासगी शाळेच्या बस वाहकाला निर्मलनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. समीर अस्लम कुरेशी (वय २६) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

वांद्रे परिसरात ११ वर्षीय मुलगा कुटुंबीयांसोबत राहण्यास आहे. गेल्या वर्षी १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबरपर्यंत हे अत्याचार सुरू होते. मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिस अधिक तपास करत आहेत. आरोपीने वेळोवेळी मुलासोबत अश्लील चाळे करत त्याच्यासोबत अनैसर्गिक अत्याचार केले. ही बाब मुलाने आईला सांगताच त्यांनी मंगळवारी पोलिस ठाणे गाठून घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला.

त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवत त्याला अटक केली आहे. कुरेशी हा एका शाळेच्या बसवर वाहक म्हणून कामाला आहे. त्याने शाळेतील कुठल्या विद्यार्थ्यांसोबत अश्लील वर्तन केले आहे का? याबाबतही पोलिस अधिक तपास करत आहेत. आरोपी पीडित मुलाच्या एका नातेवाइकाच्या जवळपास राहण्यास होता. मुलगा तेथे येताच तो त्याच्यासोबत अश्लील वर्तन करत होता.

दुसरी घटना:

वाकोलामध्ये १७ वर्षीय मुलीचा पाठलाग करत प्रीतम यादव याने ‘ये जाडे, ये मोटू, मला तू खूप आवडते, माझी होशील का, असे म्हणाला. मुलीच्या मावस भावाने याचा जाब विचारताच त्यालाही चाकूचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी वाकोला पोलिसांनी विनयभंगसह पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंदवत यादवला अटक केली आहे.

Web Title: Unnatural abuse of minor by school bus conductor

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here