Home Accident News संगमनेर: नाशिक पुणे महामार्गावर टायर फुटल्याने कार उलटली

संगमनेर: नाशिक पुणे महामार्गावर टायर फुटल्याने कार उलटली

Accident car overturned on the Nashik-Pune highway due to a flat tire

संगमनेर | Accident: नाशिक पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यातील माहुली घाटात कारचे टायर फुटल्याने कार महामार्गाच्या कडेला उलटून अपघात घडला. मंगळवारी रात्री साडे बारा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात चार जण सुदैवाने बचावले.

चालक नितीन मगाराम चौधरीसह, मगाराम चौधरी, कृपाराम चौधरी, श्रीदेवी चौधरी सर्व रा. राजस्थान हल्ली चाकण पुणे हे कारमधून नाशिक पुणे महामार्गाने नाशिककडून पुण्याच्या दिशेने मंगळवारी चाकणला जात होते. ते रात्री साडे बारा वाजेच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील माहुली घाटात आले असता त्याचदरम्यान कारचे टायर फुटल्याने कार महामार्गाच्या कडेला उलटली. या चौघांना किरकोळ दुखापत झाली असून सुदैवाने ते बचावले आहे. डोळसणे महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत वाहतूक सुरळीत केली.

Web Title: Accident car overturned on the Nashik-Pune highway due to a flat tire

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here