Home क्राईम अनैतिक संबंधाचा जाब विचारल्याने पतीने पत्नीचा केला खून

अनैतिक संबंधाचा जाब विचारल्याने पतीने पत्नीचा केला खून

Husband murder wife after questioning about immoral relationship

पुणे | Murder: पहिले लग्न झालेले असताना दुसऱ्या महिलेशी लग्न करून राहणाऱ्या नराधमाचे तिसऱ्या तरुणीशी प्रेमसंबंध जुळल्याने त्याचा जाब विचारणाऱ्या दुसऱ्या पत्नीचा गळा दाबून बाहेरून कुलूप लावून फरार झालेल्या पतीला समर्थ पोलिसांनी अटक केली आहे. त्यास न्यायालयात हजर केले असता ६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे. पुण्यातील भवानी पेठेत घडलेला हा प्रकार दीड महिन्यांनी उघडकीस आली आहे.

सलीम शकील शेख वय ३३ रा. भवानी पेठ मूळ उत्तरप्रदेश असे पोलीस कोठडी झालेल्याचे नाव आहे. त्याने सुमैय्या याचा खून (Murder) केल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप पलांडे यांनी फिर्याद दिली आहे. १३ जून रोजी ही घटना घडली आहे. २९ जून रोजी ही घटना उघडकीस आली.

Web Title: Husband murder wife after questioning about immoral relationship

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here