Home अहमदनगर दुध भेसळीसाठी वापरली जाणारी पावडर जप्त

दुध भेसळीसाठी वापरली जाणारी पावडर जप्त

Ahmednagar News Seizure of powder used for adulteration of milk

कर्जत | Ahmednagar News: दुधात भेसळ करण्यासाठी वापरली जात असलेली पावडर कर्जत पोलिसांनी पकडून दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, १३ जून रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास कर्जत पोलिसांना गुप्त खबऱ्यामार्फत बातमी मिळाली की, खेड गावाच्या दिशेने एक स्विफ्ट कार येत असून त्यामध्ये दुधात भेसळ करण्यासाठी वापरण्यात येणारी पावडर दुधात भेसळ करून वापरणार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ व पोलीस हवालदार यांना सांगून सदर ठिकाणी जाऊन तत्काळ कारवाई करा असे आदेशित केल्याने पोलीस स्टाप खासगी वाहनाने हजर होत खेड गावाच्या शिवारात एक स्विफ्ट कार आली असताना त्यास पोलिसांनी थांबवून त्यातील इसमांकडे चौकशी केली असता त्यांना त्यांची नावे असिफ गफूर शेख, अरबाज हसन शेख रा. दूरगाव ता. कर्जत असे सांगितले. सदर वाहनात झडती घेतली असता गाडीत दुधात भेसळ करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पावडरच्या २५ किलो वजनाच्या ८ गोण्या असा २८ हजार किमतीचा माल दिसला. सदर इसमांची चौकशी केली असता आम्ही ही पावडर दुधात भेसळ करण्यासाठी दूरगाव गावी चाललो होतो. पोलिसांना दोघांना पोलीस स्टेशन येथे नेऊन त्यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. तसेच दुध पावडर पोलिसांनी जप्त केली आहे.

Web Title: Ahmednagar News Seizure of powder used for adulteration of milk

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here