Home क्राईम माझ्याबरोबर लग्न कर नाहीतर तुझ्या लग्नात फाशी घेईन

माझ्याबरोबर लग्न कर नाहीतर तुझ्या लग्नात फाशी घेईन

Crime News Marry me or I will hang you in your marriage

श्रीगोंदा | Crime News: तालुक्यातील मढेवडगाव येथील एका विद्यालयीन मुलीला भिंगवन येथील ट्रक ड्राईवर मुलगा वारंवार छळत असल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून सागर प्रकाश काळे रा. भिंगवन ता. इंदापूर पुणे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 मढेवडगाव येथील ही मुलगी श्रीगोंदा येथील एका नामांकित कॉलेजात शिक्षण घेत आहे. काही दिवसांपूर्वी या मुलीच्या घरी शेताची लेव्हलिंग करत असताना निघालेला मुरूम उचलण्यासाठी हायवा ट्रकचालक सागर प्रकाश काळे याने या मुलीला तिच्या घरी पहिले. तेव्हापासून तो त्या मुलीच्या मागे सतत फिरत होता. दरम्यानच्या काळात तो मुलीचा पाठलाग करीत तिच्या विद्यालयापर्यंत येत होता. यानंतर या मुलीचा फोन नंबर मिळवून तो तिला त्रास देऊ लागला. फोन करून मला भेटायला आली नाही तर तुझ्या वडिलांना काही पण करेल अशी धमकी देत. कॉलेज समोर येत तो छेडण्याचा प्रकार करीत असे. एकदा स्विफ्ट कार घेऊन त्याने गाडीत बसण्याचा आग्रह धरला. अखेर या सर्व प्रकाराला कंटाळून २८ जून रोजी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या फिर्यादीत मी कॉलेजला जात असताना पाठलाग करून तसेच मोबाइलवर वेळोवेळी फोन करून मला, तु माझ्याबरोबर लग्न कर नाही तर दुसऱ्या मुलाबरोबर लग्न केले तर मी तेथे येऊन फाशी घेईन अशी धमकी दिली. या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

Web Title: Crime News Marry me or I will hang you in your marriage

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here