Home क्राईम संगमनेर: सासरच्या मंडळीवर गुन्हा दाखल करण्यासाठी मृतदेह पोलीस ठाण्यात

संगमनेर: सासरच्या मंडळीवर गुन्हा दाखल करण्यासाठी मृतदेह पोलीस ठाण्यात

Crime News body was taken to the police station to file a case 

संगमनेर | Crime News: सासरच्या मंडळीवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी माहेरच्या लोकांनी मृतदेह रुग्णवाहिकेतून घारगाव पोलीस ठाण्यात नेण्यात आला, गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह येथून घेऊन जाणार नाही अशी भूमिका घेतल्याने सुमारे दीड तास मृतदेह पोलीस ठाण्याच्या आवारात रुग्णवाहिकेत ठेवण्यात आला होता.

दरम्यान संगमनेर तालुक्यातील हिरेवाडी(साकुर) येथून सोमवारी बेपत्ता झालेल्या २४ वर्षीय विवाहितेचा मृतदेह विहिरीत आढळून आला.

सपना सोमनाथ गेठे वय २४ रा. समनापूर या विवाहितेच्या मृत्यू झाला आहे. मयत विवाहितेचे वडील सावळेराम लहानू खेमनर वय ४९ रा. हिरेवाडी साकुर ता. संगमनेर यांनी फिर्याद दिली असून यावरून पोलिसांनी विवाहितेचा पती सोमनाथ पांडुरंग गेठे, सासरा पांडुरंग किसन गेठे, सासू सुमनबाई पांडुरंग गेठे, दीर बाळू पांडुरंग गेठे सर्व रा. समनापूर ता. संगमनेर असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

सपना हिचा विवाह संगमनेर तालुक्यातील समनापूर येथील सोमनाथ गेठे यांच्यासोबत चार महिन्यापूर्वी झाला होता. सपना सासरी नांदत असताना त्यांचा पती, सासू, सासरा, व दीर या चौघांनी त्यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्यांना वेळोवेळी मारहाण करत शारीरक व मानसिक छळ केला. अंगावरील दागिने काढून घेत ट्रक्टर घेण्यासाठी माहेरून दोन लाख रुपये आणावेत अशी मागणी केली. या छळास कंटाळून सपना माहेरी आल्या होत्या. सोमवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घराच्या बाहेर पडल्या होत्या. त्यांनतर बुधवारी सकाळी सहा वाजता हिरेवाडी येथील विहिरीत आढळून आला. मृतदेह बाहेर काढत उतरणीय तपासणी संगमनेर कुटीर रुग्णालयात नेण्यात आला. त्यानंतर मृतदेह घारगाव पोलीस ठाण्यात नेण्यात आला.   

Web Title: Crime News body was taken to the police station to file a case 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here