Accident: ट्रॅक्टर पलटी झाल्याने ट्रॅक्टरखाली चालकाचा मृत्यू
Ahmednagar News Live | Karjat Accident | कर्जत: बारडगाव सुद्रिक येथील अंबालिका साखर कारखाना येथे ऊस पोहोच करून रिकामा ट्रॅक्टर ट्रोली महा.४५ –एएफ ०४४९ घेऊन राशीनच्या दिशेने येताना चालकाचा ताबा सुटल्याने पलटी होऊन झालेल्या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.
पांडुरंग नवनाथ जाधव वय ३२ असे या मयत ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे. मंगळवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास दौंड उस्मानाबाद राज्यमार्गावरील राशीन नजीकच्या हॉटेल रानवार्याजवळ हा अपघात घडला. संदीप बाजीराव मरकड वय ३८ रा. उमरड ता. करमाळा यांनी याबाबत पोलिसांत माहिती दिली. याप्रकरणी अधिक तपास पोलीस हवालदार तुळशीराम सातपुते हे करीत आहे.
Web Title: Accident Karjat Death of the driver under the tractor