Suicide: अकोले तालूक्यातील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
Ahmednagar News Live | Rahuri Suicide | Akole: राहुरी कारखाना येथील गुरुकुल वसाहत भागातील एका बंगल्यातील रूममध्ये भाडेकरू असलेल्या अकोले तालुक्यातील निम्ब्रळ येथील तरुण मजुराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी निदर्शनास आली.
गुरुकुल वसाहत येथील गवारी तलाठी यांचा बंगला असून खालच्या बाजुंच्या रूममध्ये गणेश लक्षमण थिटमे रा. निम्ब्रळ ता. अकोले हा तरुण मजूर भाडेकरू म्हणून राहत होता. सायंकाळी वाजता तलाठी गवारी हे नगरवरून घरी आले असताना फाशी घेतलेल्या अवस्थेत थिटमे याचा मृतदेह दिसून आला. त्यांनी तातडीने ही बाब पोलीस हेड कॉन्स्टेबल दिनकर गर्जे यांना कळविली. त्यानंतर घटनास्थळी पोलीस नाईक एस.बी. निकम, सय्यद, गणेश फाटक दाखल झाले. त्यांनी मृतदेह खाली घेतला. हा आत्महत्या करणारा तरुण राहुरी परिसरात मोलमजुरी करत असल्याचे समजते. त्याच्या आत्महत्यामागील कारण मात्र समजू शकले नाही.
Web Title: Young man from Akole taluka commits suicide by hanging