अहमदनगर जिल्ह्यातील दोन आजी-माजी मंत्र्यांना कोरोनाची लागण
Ahmednagar News Live | अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यातील आजी-माजी दोन मंत्र्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील ऊर्जामंत्री प्राजक्त तनपुरे आणि माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे.
ऊर्जामंत्री प्राजक्त तनपुरे यांना कोरोनाची लागण झाली असून माझ्या संपर्कात आलेल्यानी कोरोना चाचणी करून घ्यावी अशी माहिती तनपुरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.
तसेच माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनाही कोरोनाची लागण झाली असल्यामुळे त्यांनीही माझ्या कोणी संपर्कात आले असेल तर त्यांनी कोरोना चाचणी करावी अशी माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील मंत्री प्राजक्त तनपुरे आणि माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
Web Title: Two grandparents and former ministers of Ahmednagar corona Positive